
Vilasrao Deshmukh Birthday: मी कोणाचा मुलगा आहे... वडीलांच्या वाढदिवशी रितेशची भावनिक पोस्ट
Vilasrao Deshmukh Birthday News: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा वाढदिवस. विलासराव देशमुख आज जरी आपल्यात नसले तरी त्यांनी करून ठेवलेलं काम मोठं आहे.
आजही महाराष्ट्रातील तमाम जनतेला विलासरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मुलगा म्हणून रितेश सुद्धा वडिलांनी दिलेले संस्कार आणि शिकवण विसरला नाही.
रितेशने लातूर येथे असलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ असलेला एक फोटो शेअर केलाय. या फोटोत रितेशची मुलं रिआन आणि रिदान दिसत असून ते आजोबांच्या समाधीस्थळाला वंदन करत आहेत. हे फोटो पोस्ट करून रितेश लिहितो..
रितेश लिहीतो.. माझ्या कठीण काळात.. जेव्हा मला अक्षम, अपुरे, पराभूत वाटते तेव्हा मला आठवते की मी कोणाचा मुलगा आहे आणि मी जगाला घेऊन जाण्यास तयार आहे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा.. रोज तुझी आठवण येते.....
रितेश देशमुख अनेकदा त्याचे वडील अर्थात विलासरावांविषयी आठवणी शेयर करत असतो. रितेशने काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. '
त्या व्हिडिओत रितेशने विलासराव जो पोशाख परिधान करायचे तो पोशाख परिधान करत रितेशने विलासरावांचा भास करून दिला.'
तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आजही विलासरावांची आठवण निघाली तर रितेशने शेअर केलेल्या त्या व्हिडिओची आठवण सर्वांना होते.
रितेश देशमुख सध्या प्रचंड चर्चेत आहे. बॉलिवूड गाजवणाऱ्या रितेशने वेड सिनेमातून बॉक्स ऑफिसवर यशस्वी कमाई केली.
रितेश देशमुख निर्मित-दिग्दर्शित 'वेड' या मराठी सिनेमानं ७५ करोडचा बिझनेस आतापर्यंत करत अनेक रेकॉर्ड मराठीतले मोडीत काढले आहेत.
अजूनही 'वेड' सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ लोकांमध्ये पहायला मिळत आहे. सध्या वेड Hotstar या OTT प्लॅटफॉर्मवर आहे.