Ved Movie: 'पठाण' येऊन गेला पण 'वेड' टिकून राहिलाय.. ४५ दिवसानंतर विक्रमी कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ved movie, ved movie box office, riteish deshmukh, genelia deshmukh

Ved Movie: 'पठाण' येऊन गेला पण 'वेड' टिकून राहिलाय.. ४५ दिवसानंतर विक्रमी कमाई

Ved Movie News: शाहरुख खानचा पठाण बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला हे आता आपल्याला माहीतच आहे. पठाणने बॉक्स ऑफिसवर ९०० पेक्षा जास्त कोटी कमावले. पठाण ची हवा आता कमी झालीय.

पण रितेश - जिनिलियाचा वेड मात्र अजूनही प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे. वेडचा नवीन बॉक्स ऑफिस रिपोर्ट आलाय. या रिपोर्टनुसार वेडचे आकडे पाहिले तर अजूनही वेडची जादू कायम आहे, हेच पाहायला मिळेल.

(riteish deshmukh and genelia deshmukh ved movie latest box office report)

रितेश देशमुखची प्रॉडक्शन संस्था असलेला मुंबई फिल्म कंपनीने वेडचा लेटेस्ट बॉक्स ऑफिस रिपोर्ट सर्वाना सांगितलाय. या बॉक्स ऑफिस रिपोर्ट नुसारवेडने जगभरात ७३. ५० कोटी कमावले आहेत.

याशिवाय भारतात वेडने ६०.२४ कोटी कमावले आहेत. त्यामुळे वेड आता लवकरच ८० कोटी क्लबमध्ये जाणार का याची सर्वांना उत्सुकता आहे.

पहिल्या दिवसापासूनच 'वेड' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कामगिरी केली होती. पहिल्याच दिवशी या सिनेमाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर सिनेमा रिलीज झाल्यांनतर पहिल्या आठवड्यात वेडने २० कोटींचा पल्ला गाठला.

दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी सिनेमाने ४० कोटींचा टप्पा पार केला आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी सिनेमाने तब्बल ५० कोटींची कमाई केली होती. आता वेड ८० कोटीकडे वाटचाल करत आहे.

वेड सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी वेडने हाउसफुल्लची पाटी झळकवली.

वेडला मिळणार प्रतिसाद बघून रितेशने वेड तुझा या गाण्याचं नवीन व्हर्जन आणि काही प्रसंग समाविष्ट करून वेडची नवीन कॉपी थिएटरमध्ये रिलीज करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी वेड पाहायला गर्दी केली

'वेड' सिनेमा नागा चैतन्य आणि समंथा यांच्या 'मजिली' या तेलुगू सिनेमावर आधारित आहे. वेड जरी रिमेक असला तरीही रितेश आणि जिनिलियाच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे‌.

वेड सिनेमात रितेश - जिनिलिया जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सुपरस्टार सलमान खानचं वेड लावलंय हे विशेष गाणं प्रचंड गाजलं. मराठी कलाकारांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी या गाण्यावर रील व्हिडिओ बनवले आहेत.