कॉमेडियन म्हणून Riteish Deshmukh वाईट.. पाकिस्तानी अभिनेत्री Saba Qamar चं परखड विधान चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

saba qamar, riteish deshmukh, ved

कॉमेडियन म्हणून Riteish Deshmukh वाईट.. पाकिस्तानी अभिनेत्री Saba Qamar चं परखड विधान चर्चेत

Riteish Deshmukh News: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. रितेशच्या स्टाईलचे, त्याच्या कॉमेडीचे, त्याच्या डान्सचे लाखो चाहते दिवाने आहेत.

पण पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरने मात्र रितेशचा फोटो पाहताच एक अशी कृती केलीय ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सबा कमर हि एक पाकिस्तानी अभिनेत्री असून तिने हिंदी मिडीयम सिनेमात इरफान सोबत काम केलं होतं.

(Riteish Deshmukh is bad as a comedian.. Pakistani actress Saba Qamar's harsh statement)

सबा कमरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. २०१५ मध्ये सबा कमर जिंदगी या टॉक शो मध्ये सहभागी झाली होती.

त्यावेळी सूत्रसंचालकाने एकेक करून सबाला बॉलिवूड अभिनेत्यांचे फोटो दाखवले. तेव्हा रितेश देशमुखचा फोटो येताच, तुला याच्यासोबत कॉमेडी सिनेमात काम करायला आवडेल का असा प्रश्न निवेदकाने सबाला विचारला.

तेव्हा सबा उत्तर देताना स्पष्टच म्हणाली कि..."मी रितेश देशमुख सोबत कॉमेडी करू शकत नाही. कॉमेडियन ॲक्टर म्हणून रितेशसोबत माझी चांगली केमिस्ट्री जुळणार नाही. रितेश मी पाकिस्तानात चांगलं काम केलंय.

मी इथे A लिस्टेड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे कॉमेडी करताना पण बॉलीवुडमधला A क्लास अभिनेता मला हवाच.." अशा शब्दात सबाने रितेश बद्दल तिचं परखड विधान केलंय.

रितेशने मस्ती, हाऊसफुल, धम्माल अशा सिनेमांतून उत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलीय. रितेशने बॉलिवूडमध्ये सुरूवात रोमँटिक हिरो म्हणून केली असली तरीही नंतर रितेशने कॉमेडी सिनेमांची वाट निवडली.

रितेशचे अनेक कॉमेडी सिनेमे गाजले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्री सबाने बेजबाबदार विधान केलंय अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान लय भारी, वेड नंतर रितेश - जिनिलिया देशमुखच्या वेड सिनेमाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं. वेड च्या माध्यमातून जिनिलिया देशमुखने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तर रितेशचा वेड हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा. वेड मुळे रितेशने पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या मनामनात स्थान निर्माण लेण्या