रितेश देशमुखने सलमान खानवर बनवला मजेशीर व्हिडिओ, हसून हसून व्हाल लोटपोट

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

रितेश पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसाठी एक मजेशीर टिकटॉक व्हिडिओ घेऊन आला आहे..आणि हा व्हिडिओ त्याने केलाय तो चक्क सलमान खानवर..

मुंबई- अभिनेता रितेश देशमुख त्याच्या टिकटॉक व्हिडिओसाठी खूपंच प्रसिद्ध आहे..त्याने केलेले टिकटॉक व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहेत..आणि प्रेक्षकही त्याला उदंड प्रतिसाद देत आहेत..रितेश पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसाठी एक मजेशीर टिकटॉक व्हिडिओ घेऊन आला आहे..आणि हा व्हिडिओ त्याने केलाय तो चक्क सलमान खानवर..

हे ही वाचा: विकी कौशलने केला लॉकडाऊनचा भंग? हैराण झालेल्या विकीने दिली अशी प्रतिक्रिया..

रितेशने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये काही वर्षांपूर्वी असलेल्या एका गाण्याचा रिऍलिटी शोमधील स्पर्धक आसमा रफी आणि सलमान खान यांच्यामधील मजेदार संभाषणाची नक्कल करताना रितेश दिसतोय.. या रिऍलिटी शोच्या मुख्य एपिसोडमध्ये सलमान खानने अरबीमध्ये त्याचं १९९९ मधील सुपरहिट सिनेमा 'बिवी नंबर वन'मधील प्रसिद्ध गाणं 'चुनरी चुनरी' आसमाला गाण्याची विनंती केली होती..ओमानमध्ये राहणा-या आसमाने यावर सलमानला उत्तर देत म्हटलं होतं की तिला या गाण्याची केवळ हिंदी आवृत्ती माहिती आहे..आणि ते देखील ती मोठ्या मुश्किलीने शिकलीये..जेव्हा सुपरस्टार सलमानने तिला इतर कोणतंही अरबी गाणं गायला सांगितलं तेव्हा तिने हसत हसत उत्तर देत म्हटलं होतं, 'ना कर सलमान ना कर..'

या व्हिडिओमध्ये रितेश आसमाची नक्कल करतोय तर पाठून कोणीतरी सलमानची वाक्य बोलत आहे..रितेशने या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी खूप सारे मजेशीर टिकटॉक व्हिडिओ बनवले होते..

Riteish Deshmukh & Genelia Deshmukh's 'Saajan' Romance On TikTok ...

काही दिवसांपूर्वी रितेशने साजन सिनेमामधील 'मेरा दिल भी कितना पागल है' गाण्यावर पत्नी जेनेलियासोबत बनवलेला रोमँटिक टिकटॉक व्हिडिओ त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलांच गाजला होता..हे मुळ गाणं माधुरी दिक्षित आणि संजय दत्तवर चित्रीत झालं होतं..त्यामुळे रितेशने हा व्हिडिओ दोघांनाही टॅग केला होता..रितेश आणि जेनेलियाची जोडी प्रेक्षकांना खुप आवडते.. अनेकदा हे दोघं मजेशीर व्हिडिओ बनवत प्रेक्षकांना खूप हसवत असतात.. 

riteish deshmukh makes a video on salman khan went viral  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: riteish deshmukh makes a video on salman khan went viral