esakal | "तू तुझ्या पत्नीकडे लक्ष दे"; जिनिलियावरून सुनावणाऱ्याला रितेशचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Riteish deshmukh

"तू तुझ्या पत्नीकडे लक्ष दे"; ट्रोलरवर भडकला रितेश

sakal_logo
By
स्वाती वेमूल

सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सर्वाधिक फटका हा सेलिब्रिटींना बसताना दिसतो. सेलिब्रिटींच्या फोटो, व्हिडीओवरून किंवा एखाद्या वक्तव्यांवरून त्यांना सर्रास ट्रोल केलं जातं. अशा ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्यासाठी अभिनेता अरबाज खानने 'पिंच' हा चॅट शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या शोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेता रितेश देशमुख Riteish deshmukh आणि पत्नी जिनिलिया Genelia यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांनीही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. जिनिलियावर लक्ष ठेव, असं म्हणणाऱ्या एका ट्रोलरला रितेशने चांगलाच सल्ला दिला आहे.

काय म्हणाला रितेश?

"माझीसुद्धा हीच इच्छा आहे की, माझ्या पत्नीकडे लक्ष देण्यापेक्षा तू तुझ्या पत्नीवर लक्ष दे", असं उत्तर रितेशने त्या ट्रोलरला दिलं आहे. अरबाजने रितेश आणि जिनिलियाला त्यांच्या फोटो आणि व्हिडीओवरील ठराविक कमेंट्स वाचून दाखवले आणि त्यावर त्याचं उत्तर विचारलं.

'निर्लज्ज आंटी' म्हणणाऱ्या ट्रोलरला जिनिलियाचं सडेतोड उत्तर

रितेश, प्रिती झिंटा आणि जिनिलियाच्या एका व्हिडीओवर अर्वाच्च भाषेत टिप्पणी करणाऱ्या नेटकऱ्याला जिनिलियाने यावेळी सडेतोड उत्तर दिलं. 'निर्लज्ज, असभ्य आंटी नेहमीच ओव्हरअॅक्टिंग करत असते. लग्न झालं असूनही, दोन मुलांची आई असून तुझ्या वयाला आणि चेहऱ्याला अशा पद्धतीचे हावभाव चांगले दिसत नाहीत. तुझी ओव्हरअॅक्टिंग पाहून मुलांनासुद्धा लाज वाटेल', अशा पद्धतीची नेटकऱ्याची कमेंट होती. ही कमेंट वाचून जिनिलियाला धक्काच बसला. ती म्हणाली, "मला नाही वाटत, की त्या व्यक्तीचा तो दिवस चांगला गेला असेल. भाईसाहब, तुम्ही ठीक असाल अशी मी आशा करते. तुम्ही तुमच्या घरी ठीक राहा."

हेही वाचा: माझी तुझी रेशीमगाठ: शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती

ट्रोलिंगबद्दल रितेशनेही यावेळी त्याचं मत मांडलं. "जर तुम्ही सेलिब्रिटी व्हायचा निर्णय घेत असाल, तर लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागेल. त्याबद्दल कोणीही वाईट वाटून घेऊ नये. मी नेहमीच अशा ट्रोलर्ससाठी लिहितो की, मित्रा.. माझं तुझ्यावर प्रेम आहे."

loading image
go to top