"जेनेलियाला फक्त महाराष्ट्रात तुझी बायको म्हणून ओळख"; रितेशनं सांगितला साऊथमधला चक्रावणारा अनुभव : Riteish-Genelia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Riteish Genelia

Riteish-Genelia: "जेनेलियाला फक्त महाराष्ट्रात तुझी बायको म्हणून ओळख"; रितेशनं सांगितला साऊथमधला चक्रावणारा अनुभव

मुंबई : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे कलाकार जोडप महाराष्ट्र लाडकं जोडप आहे. सध्या त्यांच्या 'वेड' या सिनेमानं महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलंय.

या जोडीपैकी जेनेलियाला तर आपल्याकडं वहिनी असंच संबोधलं जातं. पण यापलिकडेही तिची मोठी ओळख आहे, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ती स्टार आहे.

तिचं हे स्टारडम एका खुद्द रितेशनं अनुभवलं तिच्या चाहत्यानं व्यक्त केलेल्या भावना ऐकून तर रितेश चक्रावूनच गेला. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात रितेशनं हा अनुभव शेअर केला आहे. (Riteish Deshmukh shared dizzying experience in South about Genelia)

हेही वाचा: Modi Visit to Mumbai: "माजू नका! अन्यथा आम्हाला माज उतरवता येतो"; कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं अरविंद सावंत संतापले

जेनेलियाची ओळख महाराष्ट्रात जेनेलिया रितेश देशमुख अशीच आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची सून आणि रितेशची पत्नी म्हणून तिला मोठ्या अभिमानानं लातूरकरच तिला वहिनी म्हणून संबोधतात. लग्नानंतर जेनेलियानं सिनेमांमध्ये काम करणं जवळपास बंदच केलं होतं. कौटुंबिक आणि मुलांची जबाबदारी म्हणून तिनं हा निर्णय घेतला होता.

हेही वाचा: PM Modi visit to Mumbai: पूर्वी आपण कसंबसं भागवत होतो, आज मोठी स्वप्न पाहतोय; मोदींनी व्यक्त केला विश्वास

पण रितेशनं कपिलच्या शोमध्ये सांगितलं की, माझ्यापेक्षा जेनेलियानं अनेक भाषांमधून काम केलं आहे. कमाईच्याबाबतीत ती माझ्यापेक्षाही वरचढ आहे. याबाबतच एक आठवण सांगताना रितेश म्हणाला की, आम्ही क्रिकेटची सेलिब्रेटी लीग खेळत होतो.

या लीगमध्ये मराठी, कन्नड, तामिळ, तेलगू आणि बॉलिवूड अशा विविध टीम होत्या. या लीगमध्ये खेळण्यासाठी मी एकदा बंगळुरुला गेलो होतो. तिथं एका लिफ्टमधून जात असताना साऊथ इंडस्ट्रितले काही सेलिब्रेटी खेळाडू तिथं होते. मला पाहताच ते 'जेनेलियाज हजबंड' असं म्हणाले. त्याच्या या वक्तव्यामुळं खरंतर माझा इगोहर्ट झाला.

हेही वाचा: PM Modi Visit to Mumbai : मुंबईकडं पैशांची कमी नाही, पण...; PM मोदींचा शिवसेनेवर निशाणा

जेनेलियाची ओळख ऐकून रितेश आवाक्

दरम्यान, त्या दोघांना मी म्हणालो की, इथं मी जेनेलियाचा नवरा म्हणून ओळखला जातो पण महाराष्ट्रात ती रितेश देशमुखची बायको म्हणून ओळखली जाते. तर यावर ते दोघेजण हसून म्हणाले, जेनेलियाला रितेशची बायको म्हणून फक्त महाराष्ट्रात म्हणजेच एकाच राज्यात ओळखलं जातं.

पण आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ अशा चार राज्यात तुला जेनेलियाचा नवरा अशी ओळख आहे. त्यांचे हे बोल ऐकून तर रितेश आवाक् झाला आणि त्याला कधी एकदा लिफ्टमधून बाहेर पडतो असं झालं होतं.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

जेनेलियाला येतात सात भाषा

सकाळच्या स्वास्थम या कार्यक्रमात बोलताना रितेशनं जेनेलियाची खास बाब सांगितली होती ती म्हणजे, मला तर केवळ तीन भाषा येतात, मराठी-हिंदी-इंग्रजी पण जेनेलियाला सात भाषा येतात. यामध्ये इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी आणि बंगाली या भाषांचा समावेश आहे. या सर्व भाषांमधून तिनं कामंही केली आहेत.