आज विलासरावांची जयंती, अभिनेता रितेश देशमुखची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

अभिनेता रितेश देशमुखनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Riteish Deshmukh shared emotional post for dad Vilasrao's 75th birth anniversary
Riteish Deshmukh shared emotional post for dad Vilasrao's 75th birth anniversarysakal

Riteish Deshmukh : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. रितेश कायमच आपल्या भावना समाज माध्यमांवर मांडत आलेला आहे. विलासरावांचे कपडे हातात घेऊन त्याने केलेला व्हिडीओ अजूनही चाहत्यांच्या स्मरणात आहे. अशातच त्याने 'बाबा तुमची खुप आठवण येत आहे' असं म्हणत सर्वांना भावुक केले आहे. (Riteish Deshmukh share emotional post for dad Vilasrao's 75th birth anniversary)

Riteish Deshmukh shared emotional post for dad Vilasrao's 75th birth anniversary
मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज.. ‘ वाय ’ चित्रपटाच्या पोस्टरने लक्ष वेधले

त्याने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये रितेशची दोन्ही मुलं विलासरावांच्या फोटोपुढे बसून अभिवादन करत आहेत. रितेशनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की , 'बाबा, मला तुम्हाला खट्टा मिठी मारायची आहे. मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला हसताना बघायचं आहे. मला तो क्षण पाहायचा आहे, जेव्हा तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणता की, मी तुझ्या कायम सोबत आहे. मला तुमचा हात पकडून चालायचं आहे. मला तुमच्यासोबत खेळायचं आहे. हॅप्पी बर्थ-डे पप्पा, मला तुमची खूप आठवण येत आहे.' रितेशच्या या पोस्टने अनेकांचे डोळे पाणावले. या पोस्टसोबतचं काही फोटो देखील शेअर केले आहेत.

रितेश देशमुखने आयुष्यात बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या आहेत. त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. परंतु एक व्यक्ती अशी आहे ज्यांच्या नसण्याची उणीव त्याच्या मनात कायम आहे. ते म्हणजे त्याचे वडील विलासराव देशमुख. विलासरावांनी केवळ कुटुंबावरच नाही तर अवघ्या महाराष्ट्रावर भरभरून प्रेम केलं. विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी महाराष्ट्रातील बाभळगाव येथे झाला होता. काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांनी दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांना देवाज्ञा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com