अजूनही विश्वास बसत नाही..! Satish Kaushik यांच्या निधनाने Riteish Deshmukh धक्क्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satish kaushik, satish kaushik passed away, riteish deshmukh

अजूनही विश्वास बसत नाही..! Satish Kaushik यांच्या निधनाने Riteish Deshmukh धक्क्यात

Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते सतिश कौशिक यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड गेले.

सतीश कौशिक यांचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून याविषयी माहिती दिलीय. सतीश कौशिक यांच्या अकस्मात निधनाने सर्वांना मोठा धक्का बसलाय. अशातच सतीश कौशिक यांच्याविषयी अभिनेता रितेश देशमुखने भावुक पोस्ट लिहिली आहे.

(Riteish Deshmukh shocked by Satish Kaushik's death)

सतीश कौशिक यांचा आनंदी फोटो शेयर करून रितेश लिहितो, तुम्ही गेला आहात यावर विश्वास बसत नाही. तुमचे मनमोकळे हास्य अजूनही माझ्या कानात घुमते.

एक दयाळू आणि दिलखुलास सह-अभिनेता तुम्ही होता.. तुम्ही अनेक गोष्टी नकळत शिकवून जायचा. तुमची आठवण येईल, तुमचा वारसा आमच्या हृदयात जिवंत राहील. अशा शब्दात रितेश देशमुखने सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सतीश कौशिक यांचे जिवलग मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी आज सकाळी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये अनुपम खेर म्हणाले, "मला माहित आहे मृत्यू हेच या जगाचं अंतिम सत्य आहे.

पण ही गोष्ट मी माझा जवळचा मित्र सतिश कौशिकसाठी लिहेन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. ४५ वर्षांच्या मैत्रीवर हा असा अचानक पूर्णविराम. सतिश, तुझ्याशिवाय आयुष्य पहिल्यासारखं नक्कीच राहणार नाही."

सतीश कौशिक यांनी केवळ अभिनयातच नव्हेत तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा सर्वच स्तरांवर सतीश कौशिक यांनी यशस्वी कामगिरी केलीय. सतीश यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणा इथं झाला.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं. १९८७ मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटामध्ये कॅलेंडर या भूमिकेतून त्यांना बॉलिवूडमध्ये कमालीची लोकप्रियता मिळाली.

टॅग्स :satish kaushik