Riteish Deshmukh Video: बापाची MI, तर लेकाची Gt मगं राडा तर होणारचं! जिनीलियाने शेयर केला भन्नाट व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Riteish Deshmukh Video, Riteish Deshmukh news, genelia deshmukh, ipl. mi vs gt, mumbai indians, gujrat titans

Riteish Deshmukh Video: बापाची MI, तर लेकाची Gt मगं राडा तर होणारचं! जिनीलियाने शेयर केला भन्नाट व्हिडिओ

Riteish Deshmukh Video about IPL MI vs GT news: काल IPL ची Qualifier २ मॅच झाली. या मॅच मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात तुल्यबळ लढत झाली. गुजरातच्या शुभमन गिलने शतक झळकावले.

तर मुंबईच्या सूर्यकुमार यादवने एकहाती लढत द्यायचा प्रयत्न केला. पण मुंबईला अपयश आले. आणि गुजरात टायटन्सने सामना खिशात टाकून फायनलमध्ये दिमाखात एंट्री केली.

याच मॅच दरम्यान अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा मुलगा राहील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

(riteish deshmukh support mumbai indians and his son support gujrat titans, funny video shared by genelia deshmukh)

या व्हिडिओत असं दिसतंय की रितेश त्याचा मुलगा राहील सोबत मॅच बघत असतो. यावेळी रितेश मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसतो. तर राहील गुजरात टायटन्सच्या बाजूने.

दोघेही बाप लेक मॅच पाहण्यात एकदम हरवून गेले असतात. रितेश तर मुंबई मुंबई म्हणत एकदम जोश मध्ये असतो.

अशातच राहील म्हणतो.. बाबा शुभमन गिलचि सेंच्युरी होणार. रितेश मग त्याला म्हणतो.. मग काय झालं.. असं म्हणत रितेश पुन्हा एकदा मुंबईच्या नावाचा जयघोष करतो.

रितेश जोरजोरात मुंबई मुंबई असं म्हणत मुलाला मुद्दाम चिडवत असतो. पुढे राहील शांत असतो आणि अचानक राहील रितेशला शुभमनच्या बॅटिंग कौशल्यांची आठवण करुन देत आता मुंबई हरणार अशा आशयानं चिडवायला लगतो.

हे ऐकताच रितेश कॅमेरात बघून मुलाकडे नाराजीने बघतो. या दोघांचा हा धम्माल व्हिडोओ जिनिलियाने शूट केलाय.

जिनिलियाने या व्हिडिओला कॅप्शन दिलंय की.. मुलगा आणि बाप जेव्हा दोन वेगळ्या टीम्सना सपोर्ट करताना दिसतात. मुंबई इंडियन्स vs गुजरात टायटन्स असं कॅप्शन देत जिनिलिया हा व्हिडिओ शूट करताना बाप लेकाची धमाल केमिस्ट्री बघून हसताना दिसतेय.

रितेश देशमुख सध्या प्रचंड चर्चेत आहे. बॉलिवूड गाजवणाऱ्या रितेशने वेड सिनेमातून बॉक्स ऑफिसवर यशस्वी कमाई केली.

रितेश देशमुख निर्मित-दिग्दर्शित 'वेड' या मराठी सिनेमानं ७५ करोडचा बिझनेस आतापर्यंत करत अनेक रेकॉर्ड मराठीतले मोडीत काढले आहेत.

अजूनही 'वेड' सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ लोकांमध्ये पहायला मिळत आहे. सध्या वेड Hotstar या OTT प्लॅटफॉर्मवर आहे.