सुखी संसाराचं रहस्य सांगत रितेश देशमुख भर कार्यक्रमात जिनीलियाच्या पडला पाया..Riteish Deshmukh Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Riteish Deshmukh & Genelia Deshmukh

Riteish Deshmukh Viral Video: सुखी संसाराचं रहस्य सांगत रितेश देशमुख भर कार्यक्रमात जिनीलियाच्या पडला पाया..

Riteish Deshmukh Viral Video: रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुख हे कपल बॉलीवूडकरांना जितकं प्रिय आहे तितकीच या कपलची क्रेझ मराठी इंडस्ट्रीतही आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीपासनं ते त्यांच्या सुखी संसारापर्यंत साऱ्याच गोष्टींचा लोक हेवा करतात.

आज लग्नाच्या १२ वर्षानंतरही हे सेलिब्रिटी कपल आपल्यातील बॉन्डिंग,प्रेम ज्यापद्धतीनं वर्षागणिक फुलवताना दिसत आहे ते सगळ्यांनाच प्रेरित करणारं आहे. नुकताच या दोघांचा झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

ज्यात रितेश सुखी संसाराचं सूत्र सांगताना चक्क भर मंचावर सर्वांसमोर आपली पत्नी जीनिलिया हिच्या पाया पडला आहे. अर्थात त्यानं जे आपल्या विनोदी अंदाजात सुखी संसाराचं सूत्र सांगितलं ते आणखीन खळखळून हसवणारं आहे. चला जाणून घेऊया नेमकं व्हिडीओत आहे तरी काय?(Riteish Deshmukh Viral Video Genelia deshmukh ved movie zee marathi award show)

नुकताच झी मराठीनं आयोजित केलेेला एक पुरस्कार सोहळा पार पडला. मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. याच कार्यक्रमात नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिनं देखील लावणीचा ठुमका लगावत धडाकेबाज परफॉर्मन्स दिला.

श्रेयस तळपदे सोहळ्याचं सूत्रसंचालन करत होता आणि त्यानं मंचावर आलेल्या रितेश देशमुख आणि जिनीलिया यांना सुखी संसाराचं सूत्र विचारलं. तेव्हा त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत रितेश म्हणताना दिसला,''काही नाही फक्त लवकरात लवकर आपली हार स्विकारायला शिका म्हणजे तुमचा संसार सुखी होईल''. आणि बाजूला उभ्या असलेल्या जिनीलियाच्या चक्क तो पाया पडला. हे पाहून सगळ्या पब्लिकमध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा: ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

रितेशनं आणि जिनीलियानं मंचावर आपल्या सुपरहिट 'वेड' सिनेमातील 'मला वेड लागलंय' गाण्यावर डान्सही केला. अर्थात गाण्याची हुकअप स्टेप पाहून अनेकांना डान्सचा मोह आवरला नाही.

रितेश देशमुख निर्मित-दिग्दर्शित 'वेड' या मराठी सिनेमानं ७५ करोडचा बिझनेस आतापर्यंत करत अनेक रेकॉर्ड मराठीतले मोडीत काढले आहेत. अजूनही 'वेड' सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ लोकांमध्ये पहायला मिळत आहे.