मुलांसह रितेश घालतोय 'बाला बाला'वर धिंगाणा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

हाऊसफुल 4 मधील बाला गाण्यावरील डान्सने सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घातला आहे. अक्षय कुमारने दिलेले #BalaChallenge रितेश देशमुख याने चांगलेच मनावर घेतले आहे. रितेशने त्याच्या मुलांसोबत #BalaChallengeवर डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

हाऊसफुल 4 चित्रपट रिलिज झाला असून बॉक्स ऑफिसवर 150 करोडच्या कमाईचा टप्पा गाठल्याचे रितेशने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याच आनंदात त्यांने त्याच्या मुलांसह डान्स केला आहे. मुलगा रियान आणि राहिल सह हाऊसफुल 4 मधील बाला या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स जेनिलियाने शुट केला आहे. 

रितेशने या आधी देखील #BalaChallenge स्विकारत रस्त्यावर डान्स केला होता. या व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ritesh Bala Dance with his son viral on social media