रितेश देशमुखला वडील विलासराव देशमुख यांच्यावर बनवायचाय जीवनपट..पण 'ही' आहे अडचण...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

अभिनेता रितेश देशमुखला वडिल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर आधारित जीवनपट बनवण्याची इच्छा आहे..परंतू रितेश त्यासाठी चांगल्या स्क्रीप्टच्या शोधात आहे.

अभिनेता रितेश देशमुखला वडिल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर आधारित जीवनपट बनवण्याची इच्छा आहे..परंतू रितेश त्यासाठी चांगल्या स्क्रीप्टच्या शोधात आहे..स्व. विलासराव देशमुख 1999 ते 2003 आणि 2004 ते 2008 असे दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते..

Image result for riteish deshmukh vilasrao deshmukh

रितेश त्याच्या आगामी 'बागी' या सिनेमाच्या प्रमोशनवेळी माध्यमांसोबत चर्चा करताना दिसून आला...'बागी 3' वेट्टई या 2012 मध्ये रिलीज झालेल्या तमिळ सिनेमाचा रिमेक आहे..या सिनेमात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असणारे..या सिनेमाचं दिग्दर्शन अहमद खान यांनी केलंय....

Image result for riteish deshmukh in baghi 3

याचदरम्यान रितेशने आपल्या वडिलांच्या जीवनपटाविषयीची इच्छा बोलून दाखवली.आपल्या वडिलांबाबत रितेश सांगतो की, त्यांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली होती..आणि त्यानंतर दोनवेळा त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भुषवलं..खूप लोक माझ्याकडे त्यांच्या जीवनपटाची स्क्रीप्ट घेऊन येतात पण मला अशी स्क्रीप्ट हवी आहे जी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबतंच माझ्या वडिलांचं आयुष्य देखील चांगल्या प्रकारे मांडू शकेल..

हे ही वाचा: बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान करतोय त्याच्या आगामी सिनेमाची तयारी

तो पुढे सांगतो, जेव्हा तुम्ही कोणाच्या आयुष्यावर पुस्तक लिहीता तेव्हा ते 500 ते 600 पानांपर्यंत लिहू शकता. मात्र जर कोणाचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला सिनेमाच्या स्वरुपात दाखवायचं असेल तर त्यासाठी 2 तास अपूरे आहेत..आणि त्यानंतरही जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत तर मग तो जीवनपट कंटाळवाणा होऊन जातो...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ritesh Deshmukh wants to make a biopic on Vilasrao Deshmukh