काहींना वाटला वेडेपणा, पण खरंय ते 'वेड'; रितेशची पोस्ट

अभिनय, निर्माता असण्यासोबत आता रितेशने दिग्दर्शन देखील सुरू केले आहे.
काहींना वाटला वेडेपणा, पण खरंय ते 'वेड'; रितेशची पोस्ट
Instagram

अभिनेता रितेश देशमुख हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. हाऊसफुल सिरिज, हे बेबी, लय भारी, एक व्हिलन, तेरे नाल लव हो गया अशा अनेक चित्रपटांमध्ये रितेशने उत्तम अभिनय केला आहे. त्याच्या नंतर त्याने प्रोडक्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्याने स्वत:चे 'मुम्बई फिल्म कंपनी' नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. बालक पालक, येलो या चित्रपटांचा तो निर्माता होता.

अभिनय, निर्माता असण्यासोबत आता त्याने दिगदर्शन देखील सुरू केले आहे. गेले काही महीने तो चित्रपटाच्या शुटिंगमध्येच व्यस्थ होता. स्वत:च्या 'वेड'या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना दुसरीकडे तो अभिनेता म्हणून संजय गुप्तांच्या 'विस्फोट' या चित्रपटामध्ये काम करत होता. तो म्हणाला, पुढच्या दोन महिन्यात चित्रपटाचे शुटिंग संपेल. या चित्रपटाची स्टोरी त्याला इतकी भावली की त्याला त्याचे दिग्दर्शन करण्याची इच्छा झाली होती.

काहींना वाटला वेडेपणा, पण खरंय ते 'वेड'; रितेशची पोस्ट
''त्या दिवसानंतर मी माझा वाढदिवस कधीच साजरा केला नाही'' - धर्मेंद्र

दिग्दर्शन ही एक अंतर्ज्ञानी प्रक्रिया असून, मला खूप काही शिकता आले, हे देखील तो म्हणाला. त्याच्या मते अभिनेता म्हणून आपण एका चित्रपटाचा भाग असतो, निर्मात्याचा तर तो चित्रपट पूर्णपणे असतो पण दिग्दर्शन हा त्या चित्रपटाचा कर्ताधर्ता असतो.

या नवीन मराठी चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे...या चित्रपटातून जेनेलिया देशमुख मराठी सिने सृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे अर्थातच हा चित्रपट दोघांसाठीही अत्यंत खास आहे. जेनेलियासोबत यामध्ये हिंदी अभिनेत्री जिया शंकर सुद्धा असणार आहे. तिचा देखील हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com