रणवीर आणि दीपिका मागवतात 'या' ठिकाणचं जेवण, खर्च करतात लाखो रुपये !

वृत्तसंस्था
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

जाणून घ्या दीपिका आणि रणवीर यांच्या खाण्याच्या फेवरेट ठिकाणाविषयी. 'ही' कंपनी देते सेलिब्रिटींना खाणं, रणवीर आणि दीपिका एकावेळी खर्च करतात लाखो रुपये ! 

मुंबई :  बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच सर्वात जास्त महत्त्व आहे ते फिटनेसला! त्यामुळे बॉलिवूड कलाकार आपला सर्वाधिक वेळ जिममध्ये घालवताना दिसतात. जिम, योग, एक्सरसाइजगे सर्व करत असतानाच या कलाकारांना नियंत्रण ठेवावं लागतं ते खाण्यावर. त्यामुळे कलाकार काय खातात, कशाप्रकारे डाएट ठेवतात याविषयीची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. डाएट फॉलो करत असताना कोणत्या रेस्टॉरेंटमध्ये, कोणता पदार्थ खाणं पसंत करतात हे लोकांना जाणून घ्यायला आवडतंच. जाणून घ्या दीपिका आणि रणवीर यांच्या खाण्याच्या फेवरेट ठिकाणाविषयी! 

योग्य आहार घेणं कलाकरांना भाग असतं. त्यामुळे शुटिंगमध्ये व्यस्त असताना कलाकार अनेकदा खाणं ऑर्डरही करतात. 'पॉड सप्लाय' POD (Personal Optimised Diet) नावाची कंपनी सेलिब्रिटींना हेल्दी खाणं देण्याचं काम करते. दीपिका पदुकोन, अक्षय कुमार, अनिल कपूर, संजय दत्त, रणवीर सिंग ही मंडळी याच कंपनीच्या खाण्याला पसंती देतात. अनमोल सिंघल हे या सप्लायचे सहसंस्थापक आणि व्यवसाय प्रमुख आहेत. थोड्या वेळाच्या कालावधीतच या कंपनीने बॉलिवूडमध्ये आपलं चांगलं नेटवर्क तयार केलं आहे.

रणवीर सिंग गेल्या सहा वर्षापासून या कंपनीचं खाणं पसंत करत असल्याचं अनमोल सागंतात. एवढचं काय तर रणवीरच्या घरातील मंडळींचही पॉड सप्लायचं खाणं फेवरेट आहे. अशी माहिती 'टाईम्स फूड' ला अनमोल सिंघल यांनी दिली.

सेलिब्रिटी त्यांच्या शुटिंगमुळे वेगवेगळ्या शहरात जातात. त्यावेळीही ही कंपनी त्यांचं खाणं अगदी अचुक पद्धतीने शुटिंगच्या लोकोशनवर पोहोचवण्याचं काम करते. सबस्क्रिप्शन पद्धतीवर आधारीत ही कंपनी लाखोंच्या घरात पैसे घेते. सेलिब्रिटींच्या डाएट, आवडी-निवडी आणि फिटनेसच्या आवश्यक्तेनुसार ही कंपनी त्यांना खाणं पुरवते. 

दीपिकाच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यानं होते. 1 ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस टाकून हे पाणी ती सकाळी पिते. दीपिकाच्या ब्रेकफास्टमध्ये 2 अंडी, 2 बदाम, 1 कप लो फॅट मिल्क, 2 इडल्या किंवा 2 प्लेन डोसा किंवा उपमा याचा समावेश असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दुपारच्या जेवणाआधी दीपिका ताजी फळं खाते. तर दुपारच्या जेवणात घरीच बनवलेली डाळ-भात, भाजी, सलाड आणि दही याचा समावेश असतो. तर कधी कधी प्रोटीनसाठी ती ग्रील फिश खाते. रणवीरला भारतीय पद्धतीचं खाणं आवडतं आणि त्याचसोबत चायनिजही त्याच्या आवडीचं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rnveer and deepika orders food from this company, pays llakhs for food