बिअरचे कॅन.. वाढलेला वेग.. अन होत्याचं नव्हतं!

road accident mahakali ctors died esakal news
road accident mahakali ctors died esakal news

मुंबई : गाडी चालवता चालवता मारले जाणारे बिअरचे घोट कलाकारांना महागात पडले आहेत. गाडीवर ताबा न राहिल्याने छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या दोन कलाकारांचा मृत्यू झाला आहे. महाकाली या हिंदी मालिकेच्या सेटवर शनिवारी संध्याकाळी शोककळा पसरली. कारण या मालिकेत काम करणारे गगन कांगा आणि अरजित लवानिया यांचा अपघाती मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद हायवेवर पालघरजवळ हा घटना घडली. 

याबाबत माहिती देताना मनोर पोलीसानी दिलेली माहिती अशी, महाकाली अंत ही आरंभ है या कलर्स वाहिनीवरील मालिकेत हे कलाकार काम करतात. हे दोन कलाकार फियाट लिनिआ घेऊन प्रवास करत होते. ही गाडी गगन चालवत होते. त्याच्यासोबत असलेले अरजित हे मालिकेत नंदीची भूमिका साकारत होते. या प्रवासात अरजित गगन यांच्या बाजूला बसले होते. तर त्यांच्यासोबत एक स्पाॅटबाॅयही मागील सीटवर बसला होता. गुजरातमधील उंबरगाव येथे मालिकेचे शूट आटोपून ते मुंबईत गोरेगाव येथे परतत होते.  साधारण सकाळी सव्वा अकराच्या आसपास ही गाडी चिल्लर फाट्यापाशी आली असता, गगन यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला या गाडीने मागून धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गाडीने दिलेली धडक इतकी जबरदस्त होती की गाडीच्या टपाचा चेंदामेंदा झाला. गाडी धडकून गुजरातच्या दिशेने उभी राहीली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. गाडीच्या केलेल्या पाहणीत बीअरचे कॅन व खाण्याचे पदार्थ गाडीच्या पुढच्या बाजूस पडलेले आढळले. गाडी प्रमाणापेक्षा अधिक वेगात असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. शिवाय मिळालेले कॅन पाहता ही ड्रंक अॅड ड्राईव्हची केस असू शकते. या अपघातात तिघांच्याही मोबाईल्सचा चक्काचूर झाला. त्यातून गगन यांचे सीमकार्ड काढून त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती दिली गेली. 

या दोघांसोबत असलेल्या स्पाॅटबाॅयची ओळख अद्याप पटलेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com