
रिया रोडिज फेम राजीव लक्ष्मण सोबत दिसून येतेय. सोशल मिडियावर तर या फोटोंनी धुमाकुळ घातला आहे.
मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीतून रिया चक्रवर्ती बाहेर पडली आहे का? हा प्रश्न यासाठी विचारला जातोय कारण रिया चक्रवर्तीचे काही फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये रिया रोडिज फेम राजीव लक्ष्मण सोबत दिसून येतेय. सोशल मिडियावर तर या फोटोंनी धुमाकुळ घातला आहे.
हे ही वाचा: दीपिका पदूकोण आणि हृतिक रोशन पडद्यावर एकत्र दिसण्याच्या चर्चांचा पुन्हा उधाण
रोडिज फेम राजीव लक्ष्मणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो रिया चक्रवर्तीसोबत दिसत आहे. रिया त्याला मिठी मारताना या फोटोमध्ये दिसतेय आणि कॅमेरासमोर पाहून हसतेय. हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शन देखील दिलं आहे. त्याने लिहिलंय, 'माय गर्ल'. राजीवच्या या कॅप्शनमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राजीव नुकताच त्याच्या मित्रमंडळींसोबत एन्जॉय करताना दिसला होता. यावेळी रिया चक्रवर्ती देखील त्याच्या सोबत होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीसाठी २०२० हे वर्ष खूप अडचणींचं होतं. सुशांतच्या निधनानंतर रियावर सुशांतच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलं जात होतं. तिच्यावर अनेक आरोप लावले गेले. या केसमध्ये ड्रग्सच्या दिशेने तपास करणा-या एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली होती. यासाठी रियाला १ महिना तुरुंगवास भोगावा लागला. आता जुन्या गोष्टी विसरुन रिया पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.
रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा पडद्यावर एंट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे. २०२१ मध्ये रिया चक्रवर्तीचा आगामी सिनेमा चेहरे रिलीज होणार आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी देखील दिसून येतील. सिनेमाचं दिग्दर्शन करणारे रुमी जाफरी यांनी रिया चक्रवर्तीची नुकतीच भेट घेतली असल्याची चर्चा होती.
roadies fame rajiv laxman shares his photos with rhea chakraborty