Rocketry the nambi effect : एका शास्त्रज्ञाचा खडतर जीवनप्रवास

हा चित्रपट भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो)मधील शास्त्रज्ञ नांबी नारायण यांच्या जीवनावर बेतलेला आहे
R. Madhavan.
R. Madhavan.sakal

एका शास्त्रज्ञाचा खडतर जीवनप्रवास

बाॅलिवूडसह टॉलिवूडमध्ये देखील आपल्या निखळ आणि दमदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता आर. माधवन. आता तो रॉकेट्री द नांबी इफेक्ट या बायोपिक चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो)मधील शास्त्रज्ञ नांबी नारायण यांच्या जीवनावर बेतलेला आहे. या चित्रपटाद्वारे माधवनने पहिल्यांदाच लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासंदर्भात आर. माधवन याच्याशी साधलेला संवाद.

* रॉकेट्री द नांबी इफेक्ट या चित्रपटाची कथा तुम्हाला कुठे आणि कशी सापडली ?

रॉकेट्री द नांबी इफेक्ट हा चित्रपट करण्याआधी मी नांबी नारायण यांच्या जीवनावर आधारित पुस्तक वाचले होते. जेव्हा मी त्यांचा एकूणच जीवन प्रवास वाचला तेव्हा मला वाटलं अशा माणसावर चित्रपटाची निर्मिती का होत नाही....मग मी त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलो. तेव्हा त्यांनी माझ्या चित्रपटांची आणि माझ्या अभिनयाची स्तुती केली. त्यानंतर मी त्यांच्यासोबत संवाद साधला आणि थेट मुद्द्यावर आलो. त्यांच्यावर लागलेले गुन्हे या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना अचानक राग अनावर झाला. त्यांनी मला गुगलवर नांबी नारायण हे नाव सर्च करायला सांगितले. तेव्हा त्यांच्यावर लादण्यात आलेले गुन्हे समोर आले. त्यानंतर अधिक खोलात जाऊन त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. एकंदरीत सात ते आठ महिने मी त्यांच्यावर अभ्यास करत होतो. सात महिन्यानंतर माझा अभ्यास घेऊन त्यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे ते तेव्हा भारतात नसून प्रिंस्टन या ठिकाणी होते. त्यांनी मला सविस्तर माहिती दिली नव्हती, मात्र त्यानंतर हळूहळू त्यांच्यासोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या.

त्यानंतर मी त्यांना विकास इंजिन यासंदर्भात विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की विकास इंजिन देखील त्यांनीच बनवलेलं आहे. त्यांचे मार्गदर्शक विक्रम साराभाईंसाठी विकास इंजिनची निर्मिती केली असल्याचं त्यांनी सांगितलं. या व अशा अनेक गोष्टींची इत्थंभूत माहिती मिळाल्यानंतर मला एकूण दीड वर्ष लागले या चित्रपटाची कथा व त्याचे संवाद लिहायला. पण त्यांचा खडतर प्रवास मला प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा होता आणि आता तो या चित्रपटाद्वारे पोहचेल यात शंका नाही. भारतासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे.

* नांबी नारायण यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती व्हावी असे तुम्हाला का वाटले ?

-नांबी नारायण यांचा प्रवास खूप खडतर होता. या सगळ्या गोष्टी ऐकून खरंच मी खूप थक्क झालो. ते थोर भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो)मधील शास्त्रज्ञ होते आणि अशा वैज्ञानिकावर जो अन्याय झाला आहे ते मला सामान्य जनतेपर्यंत पोहचवायचं होतं. त्यांच्यावर जो हेरगिरीचा कलंक लागला आहे तो नाही लागला पाहिजे असे मला वाटते. इतर देशातील चित्रपट पाहून त्यांचे थोर व्यक्तींची कथा पाहून भारतीय लोकांना वाटतं की जे काही तंत्रज्ञान आहे ते बाहेर देशात आहे. परंतु आपल्या भारतात देखील असे अमूल्य हिरे आहेत ज्यांनी आपल्या भारतासाठी आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर झळकावे आणि प्रेक्षकांना खरी माहिती मिळावी यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्याचे मी ठरवले.

* या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन आणि लेखनाची बाजू सांभाळताना कसं वाटलं, काय अनुभव होता?

- मी पहिल्यांदाच दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. खरं तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मी करणार नव्हतो. कारण एक कलाकार म्हणून मला या गोष्टींचा अनुभव नव्हता. परंतु,

नांबी नारायण यांनी सांगितले की या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मी सांभाळावी. हा चित्रपट बनविताना मला तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला. मात्र माझ्या मनात एक

समाधान आहे की माझी ही सहा वर्षांची धडपड आणि नांबी नारायण यांचे एकूणच योगदान हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.

* हा चित्रपट करताना तुम्हाला विशेष काय तयारी करावी लागली ?

- या चित्रपटाचे चित्रीकरण तीन भाषांमध्ये करण्यात आले आहे. हिंदी, इंग्लिश आणि तामिळ भाषेत आम्ही शूट करत होतो. आणि आठ देशांमध्ये या चित्रपटाची शूटिंग झाली

आहे. या चित्रपटात मी नांबी नारायण यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. 29 वर्षीय तरुण ते 80 वर्षांचे वयोवृद्ध असा त्यांचा प्रवास मला दाखवायचा होता. वयोमानानुसार मी

माझ्या देहबोलीमध्ये देखील बदल घडवत होतो. कृत्रिम पद्धतीने नसून, व्यायाम आणि रंगरंगोटी करून प्रेक्षकांना खरं वाटण्यासाठी तसे बदल मी घडवत होतो. नांबी नारायण

यांचं निरीक्षण करून मी माझ्यामध्ये बदल घडवत होतो. वयोवृद्ध वाटण्यासाठी मी माझे पोट आणि वजन देखील वाढवले. या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदाच कोणत्या तरी

चित्रपटासाठी करत असेन असं मला वाटतं. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये रॉकेट लाँचिंग किंवा रॉकेट आणि इस्राोचं कार्यालय दाखवण्यात आलं आहे. परंतु, या चित्रपटाद्वारे

पहिल्यांदाच रॉकेट इंजिन दाखवण्यात येणार आहे. हे प्रेक्षकांना पहिल्यांदाच सिनेमागृहात अनुभवता येणार आहे.

* या चित्रपटात शाहरुख खान आणि सूर्या यांची विशेष भूमिका आहे, याबद्दल काय सांगाल

-एका कार्यक्रमात माझी आणि शाहरुख खान यांची भेट झाली तेव्हा मी शाहरुखला माझ्या आगामी चित्रपटासंदर्भात सांगितले होते. तेव्हा त्याने माझ्या चित्रपटात काम

करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मला तो चेष्टा करत आहे असं वाटलं. परंतु त्यानंतर त्यांच्या टीमकडून असे समजले की त्यांना खरंच माझ्या चित्रपटात काम करायचे आहे.

तेव्हा मला प्रचंड आनंद झाला आणि त्यांनी आमच्या चित्रपटात विशेष भूमिका साकारली आहे. दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका

साकारली आहे. शाहरुख खान यांचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी मी आपल्या भूमिकेचं चित्रीकरण करून घेतो असे मला त्याने सांगितले. या दोघांनीही या

चित्रपटात काम करून माझ्या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

-भाग्यश्री कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com