esakal | पाच वर्षांनंतर करण जोहर पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत; नव्या चित्रपटाची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

karan johar, ranveer singh and alia bhatt

पाच वर्षांनंतर करण जोहर पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत; नव्या चित्रपटाची घोषणा

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने(karan johar) नुकतीच त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (rocky aur rani ki prem kahani) या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) आणि अभिनेत्री आलिया भट (alia bhatt) प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा करणने सोशल मीडियावर चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर करत केली. या पोस्टरला करणने कॅप्शन दिले, 'कॅमेरा समोर माझे आवडते लोक असताना लेन्सच्या मागे दिग्दर्शक म्हणून काम करण्याचा मला आनंद मला होत आहे. सादर करत आहोत, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट दिणार असून इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.' एका ट्विटमध्ये करणने हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे, असे सांगितले आहे.(rocky aur rani ki prem kahani karan johar next film with ranveer singh and alia bhatt film)

काही दिवसांपुर्वी करणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचे लक्ष धर्मा प्रोडक्शन हाऊस मोठं करण्यावर होते. परंतु आता फिल्मच्या सेट म्हणजेच त्याच्या आवडत्या जागी परत जाण्याची त्याची इच्छा आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ऐ दिल है मुश्कील' या चित्रपटानंतर करणने लस्ट स्टोरी आणि घोस्ट स्टोरी या दोन शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केल्या आहेत.

हेही वाचा: "रणवीरला विरोध करून मीच मूर्ख ठरलो"; करण जोहरला झाली उपरती

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिणार आहेत. करणने त्याच्या 'तख्त' या चित्रपटाची घोषणा 2018 मध्ये केली. पण कोरोनामुळे या चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकल्यात आले. या चित्रपटात रणवीर सिंग, करीना कपूर खान, विक्की कौशल, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या महगिनात करणने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चे शूटिंग संपल्यानंतर 'तख्त' चित्रपटावर काम करणार आहे, असे सांगितले होते.

हेही वाचा: 'गाण्याची वाट लावली'; 'चुरा के दिल मेरा'चं रिमेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर

loading image