रॉकी गर्ल अक्षया 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

चित्रपटसृष्टीमध्ये सध्या एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय, तो म्हणजे नव्या चेहऱ्यांचा. नाटक, टीव्ही मालिकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या नव्या चेहऱ्यांना आता मोठ्या पडद्याचे वेध लागलेले दिसताहेत. अक्षया हिंदळकर हे त्यातलंच एक नाव. छोट्या पडद्यावरील "सरस्वती' या मालिकेत काम केलेली अक्षया आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. "रॉकी' या आगामी चित्रपटात अक्षया सोज्वळ संजनाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

या संधीबद्दल बोलताना अक्षया सांगते की, दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे भाग्यच आहे. प्रत्येकाकडून बरंच काही शिकायला मिळतं.' मोठ्या प्रमाणात साहसदृश्‍य असलेल्या या चित्रपटातून राहुल देव हा कलाकार मराठीत पहिल्यांदाच काम करणार आहे. तसंच अक्षया आणि संदीप साळवे ही ताज्या दमाची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. 

Web Title: Rocky Girl Akshay