नव्या रियालिटी शोमध्ये दिसणार रोहित राऊत आणि स्वानंदी टिकेकर यांची धमाकेदार जोडी

नव्या रियालिटी शोमध्ये दिसणार रोहित राऊत आणि स्वानंदी टिकेकर यांची धमाकेदार जोडी

मुंबईः  सोनी मराठीवर लवकरच सिगिंग स्टार हा कार्यक्रम येणार आहे. यामध्ये सेलिब्रेटी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋता दुर्गुळे करणार आहे. या कार्यक्रमात सध्याचा रॉकस्टार रोहित राऊत आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सहभागी होणार आहेत.

स्वानंदी टिकेकर हिला अभिनय आणि गायन यांचा वारसा आधीपासूनच लाभलेला आहे. आरती अंकलीकर-टिकेकर आणि उदय टिकेकर यांची कन्या स्वानंदी. तिची दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. स्वानंदीला या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली होती. आता ती सिंगिग स्टार या कार्यक्रमात सहभागी होत आहे.  या कार्यक्रमातून स्वानंदी आता प्रेक्षकांसमोर आपलं गाणं सुद्धा सादर करणार आहे. या कार्यक्रमात एक स्पर्धक आणि एक मार्गदर्शक अशी जोडी असणार आहे. स्वानंदीचा मार्गदर्शक आणि जोडीदार रोहित राऊत आहे.

रोहितने गायक आणि गीतकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. गेली अनेक वर्ष आपल्या गाण्याने तो प्रेक्षकांची मने जिंकत आहे. अनेक गाणी रोहितने स्वतः रचली आहेत तर कित्येक गाणी संगीतबद्ध देखील केली आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्री आणि गायकाची ही वेगळी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रोहित आणि स्वानंदी हे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. सिंगिंग स्टार हा कार्यक्रम २१ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे.

(संपादनः पूजा विचारे)

Rohit Raut Swanandi Tikekar pair starred in Singing Star Reality Show

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com