
दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज' (FWICE) ला ५१ लाख रुपयांची मदत केली आहे.
मुंबई- कोरोनामुळे संपूर्ण देशात संकट निर्माण झालं आहे..कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे...कोरोनाच्या संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवस देश लॉकडाऊन केला आहे...यात सगळ्यात जास्त संकट आलंय ते दिवसाच्या कमाईवर संसार चालवणा-या कामगारांवर...या कामगारांसाठी आणि गरजुंसाठी अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे..
HBD कपिल शर्मा: एकेकाळी कपिलकडे घर चालवायला नव्हते पैसे; आता महिन्याला कमावतो करोडो
कोरोनामुळे कलाक्षेत्रात काम करणाऱ्या विविध कामगारांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार पुढे आले आहेत. या पडद्यामागील कलाकारांमध्ये मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टाईल, स्पॉटबॉय आदींचा समावेश येतो. मराठी कलाकारांसोबत आता हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही या पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. नुकताच अभिनेता सलमान खानने 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज' (FWICE) या संस्थेद्वारे २५००० हजार कामगारांना आर्थिक मदत केली आहे.
Thank U #RohitShetty for your generosity towards the #DailyWage workers of our entertainment industry. Ur massive contribution of ₹51 lakhs towards @fwice_mum in such times of crisis is really inspiring.#FWICEFightsCorona #IndiaFightsCorona pic.twitter.com/KCgYcpbtfd
— Ashoke Pandit (@ashokepandit) March 31, 2020
यानंतर आता बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टी देखील यासाठी पुढाकार घेतला आहे. रोहितने 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज' (FWICE) ला ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. याची माहिती दिग्दर्शक आणि 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज' (FWICE) चे प्रमुख अशोक पंडित यांनी ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर करत दिली आहे.
या व्हिडिओमध्ये त्यांनी रोहितचे या मदतीसाठी आभार मानले आहेत. 'रोहित शेट्टी यांनी मनोरंजन क्षेत्रातील पडद्यामागील कलाकारांसाठी मदत केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या कठीण परिस्थितीत तुम्ही केलेली ५१ लखांसाठी फारच मोलाची आहे. आणि इतरांना प्रेरणा देणारी आहे.' असे या व्हिडिओमध्ये अशोक पंडित म्हणाले. रोहित शिवाय बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी 'पीएम केयर फंड' आणि 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' साठी करोडोंची मदत केली आहे.
कोरोनामुळे जगभरात आर्थिक संकट निर्माण झाले आहे...दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे..भारतात आत्तापर्यंत २ हजार पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे तर ५० जणांचा यामुळे मृत्यु झाला आहे..
rohit shetty donates rs 51 lakh to help industry workers