हिंदीत 'The Kashmir Files'चीच दादागिरी ! 'RRR' नं टाकल्या नांग्या

RRR सिनेमाला दुसऱ्या आठवड्या हिंदी व्हर्जनसाठी द काश्मिर फाईल्स पेक्षा खुप कमी प्रतिसाद मिळाला होता.
RRR Box Office: Film fails to beat The Kashmir Files;
RRR Box Office: Film fails to beat The Kashmir Files;google

एस.एस.राजामौली(S.S.Rajamouli) यांचा बिग बजेट सिनेमा 'RRR' च्या हिंदी व्हर्जनने सुरुवातीला बॉक्सऑफिसवर जो वेग पकडला होता तो दुसऱ्या आठवड्यात मंदावल्याचं चित्र दिसून आलं. ज्यामुळे कदाचित सिनेमाला २०० करोड पर्यंत पोहोचायला उशीर झाला. आणि सिनेमा 'द काश्मिर फाईल्स'चा रेकॉर्ड तोडू शकला नाही. 'RRR' च्या तुलनेत अगदीच माफक बजेटमध्ये बनलेल्या 'द काश्मिर फाईल्स'ने प्रदर्शनानंतर १३ व्या दिवशीच २०० करोडचा टप्पा गाठला होता. 'RRR' ने जर १३ दिवसांच्या आधी एक दिवस २०० करोडचा टप्पा गाठला असता तर म्हटलं जाऊ शकलं असतं की 'द काश्मिर फाईल्स'चा रेकॉर्ड 'RRR' ने तोडला. पण आता 'RRR' ला देखील २०० करोडचा टप्पा गाठायला १३ दिवस लागलेयत.

RRR Box Office: Film fails to beat The Kashmir Files;
धर्मेंद्रमुळे रुपाली गांगुलीच्या वडिलांना राहतं घर विकावं लागलं होतं...

RRR सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात त्याच्या कलेक्शनवर आश्चर्यकारक परिणाम झाला. सिनेमाच्या कलेक्शनमध्ये कमालीची घट झालेली दिसून आली. १२ व्या दिवशी RRR ने ६.५० करोड चं कलेक्शन केलं,ज्यामुळे सिनेमाचं १२ व्या दिवशीचं कलेक्शन १९८.०९ करोडपर्यंत पोहोचलं आहे. म्हणजे सिनेमा २०० करोडचा टप्पा गाठण्यासाठी फक्त १.९१ करोड हवे आहेत. आज ६ एप्रिल रोजी म्हणजे १३ व्या दिवशी हा २०० करोडचा टप्पा सिनेमाला गाठता येईल. बोललं जातंय की ,प्रदर्शनानंतर दुसऱ्या आठवड्यात जर RRR चे बॉक्सऑफिस कलेक्शन कमी झाले नसते तर ११ किंवा १२ दिवसांत सिनेमानं २०० करोडचा टप्पा गाठला असता.

RRR Box Office: Film fails to beat The Kashmir Files;
भारती सिंगचा हॉस्पिटलच्या लेबर रुममधील डिलिव्हरीआधीचा व्हिडीओ व्हायरल

'द काश्मिर फाईल्स' विषयी जर बोललो तर फक्त ३.५५ करोडचं ओपनिंग सिनेमाला मिळालं होतं, पण त्यानंतर सिनेमाचं बॉक्सऑफिस कलेक्शन असं वेगानं वाढत गेलं की १३ व्या दिवशीच २०० करोडचा टप्पा या सिनेमानं पार केला. 'RRR' सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला 'द काश्मिर फाईल्स'चा रेकॉर्ड तोडण्यात यश मिळालं नाही. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांमध्ये 'RRR' दुसरा हिंदी सिनेमा आहे, ज्यानं २०० करोड पर्यंत मजल मारली आहे. पण जर जागतिक स्तरावर पाहिलं तर 'RRR' ने १००० करोडच्या जवळपास ग्रॉस कलेक्शन केलं आहे. लवकर तो टप्पाही हा सिनेमा पार करेल. RRR सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला आणखी एक आठवडा आहे कलेक्शन वाढवण्यासाठी. कारण त्यानंतर १४ एप्रिल रोजी बहुचर्चित 'केजीएफ चॅप्टर २' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ज्यामुळे कदाचित 'RRR' च्या कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com