राजामौलींच्या मुलाचं योगदान कसं विसरता येईल, त्यानं RRR साठी तर..| RRR Oscar 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR Oscar 2023 SS Karthikeya son of Rajamouli struggle story

RRR Oscar 2023 : राजामौलींच्या मुलाचं योगदान कसं विसरता येईल, त्यानं RRR साठी तर....

RRR Oscar 2023 SS Karthikeya son of Rajamouli : एस एस राजामौली यांच्या आरआरआरचे कौतूक होत आहे. त्याला कारणही तसेच मोठे आहे. या चित्रपटातील गाण्याला ऑस्कर मिळाला आहे. त्यातील नाटू नाटू गाण्यावर ऑस्करमधील सेलिब्रेटीही अवाक् झाले होते. जेव्हा ऑस्करच्या रंगमंचावर नाटू नाटूचे सादरीकरण झाले तेव्हा त्या गाण्याला प्रेक्षकांनी उभे राहून दिलखुलासपणे दाद दिली होती.

यासगळ्यात आरआरआरच्या वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्या गाण्याच्या शुटिंगसाठी लागलेला वेळ, त्याचे लोकेशन, कलाकार, त्यांची प्रॅक्टिस हा सारा चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय होता. आता तर राजमौली यांच्यावर जगभरातून कौतूकाचा वर्षाव होतो आहे. यापूर्वी जगप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी राजामौलींचे कौतूक केले होते. त्यांना आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची विनंतीही केली होती.

Also read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

हे सगळं होत असताना एका व्यक्तीबाबत फार कमी माहिती सोशल मीडियावर येत राहिली. अजूनही त्या व्यक्तिविषयी फार कमी जणांना माहिती आहे. तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहिती असेल की गेल्या वर्षी २४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे प्रमोशन, कॅम्पेन ज्या वेगात आणि स्वरुपात झाले त्याची चर्चा झाली होती. बॉलीवूडमधील रथी-महारथी देखील त्यामध्ये सहभागी झाले होते.

आता आरआरआरला ऑस्कर मिळाला आहे. मात्र तो मिळण्यामागे अनेकांची मोठी मेहनत आहे. ऑस्कर मिळावा यासाठी ज्या प्रमाणात कॅम्पेन करावे लागते त्याला तोड नाही. अशा ऑस्कर कॅम्पेनमध्ये राजामौली यांचा मुलगा कार्तिकेय याचेही मोठे योगदान आहे. त्याच्या श्रेयाकडे अनेकांचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

एस एस कार्तिकेय हा राजामौली यांचा मुलगा आहे. त्यानं यापूर्वी वडिलांसोबत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजामौलींच्या मख्खी या चित्रपटामध्ये तो प्रॉडक्शन मॅनेजरचे काम करत असे. तर बाहुबली, मर्यादा रामन्ना सारख्या चित्रपटांमध्ये त्यानं सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली आहे. २४ जानेवारीला ऑस्कर नॉमिनेशन सुरु होण्यापूर्वी आरआरआऱच्या प्रॉ़डक्शन कंपनीनं व्हेरिंयस फिल्म्सनं लिहिलं होतं की, आम्हाला काहीच माहिती नाही की येत्या दिवसांमध्ये काय होणार आहे?

जगभरातल्या चाहत्यांना आमच्या चित्रपटानं जो अनुभव दिला आहे त्याला तोड नाही.हे मात्र दिसून आले. कंपनीनच्या या ट्विटमध्ये कार्तिकेय याचेही नाव होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकेयनं एक निर्माता म्हणून त्याची पहिला चित्रपट आकाशवाणीची निर्मिती करणार होता. त्याचे दिग्दर्शन अश्विन गंगराजू होते. २०१९ पर्यत त्याचे ९० टक्के शुट झाले होते. मात्र त्याच दरम्यान कार्तिकेय हा वडिलांबरोबर आरआरआऱच्या शुटमध्ये व्यस्त झाला होता. त्याला त्या चित्रपटासाठी आपला चित्रपट सोडावा लागला होता.