RRR Collection: जगभरात हजार कोटींचा व्यवसाय करणारा तिसरा भारतीय चित्रपट

दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR नं भारतीय चित्रपट (RR Rajamauli) क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
RRR Movie
RRR Movie esakal

RRR Movie: दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR नं भारतीय चित्रपट (RR Rajamauli) क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तो म्हणजे 16 व्या दिवशीच या चित्रपटानं जगभरातून तब्बल हजार कोटींचा व्यवसाय केला आहे. (Entertainment News) अशी कामगिरी करणारा हा तिसरा भारतीय चित्रपट आहे. यापूर्वी राजामौली यांच्या बाहुबलीनं (Bahubali) देखील अशीच गौरवास्पद कामगिरी केली (Tollywood News) होती. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. RRR ची सोशल मीडियावर चर्चा आहे. ज्युनि एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्सला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता RRR च्या वाट्याला यश येणार की नाही याची शंका होती.

भारतीय चित्रपट विश्वासाठी गौरवास्पद बाब म्हणजे RRR ने केवळ दुसऱ्य़ाच आठवड्यामध्ये हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक RRR ची आतुरतेनं वाट पाहत होते. त्याच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मात्र त्याला प्रेक्षकांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले. दोन स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षगाथेला RRR मधून प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन बॉक्स ऑफिसवर देखील RRR ने शंभर कोटींचा व्यवसाय केला आहे.

RRR Movie
RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

RRR ला काश्मीर फाईल्सची जोरदार टक्कर होती. 1990 च्या काळात काश्मीरी पंडितावर जे अत्याचार झाले त्यावर भाष्य या चित्रपटामध्ये करण्यात आले होते. त्याचा सोशल मीडियावरुन झालेला प्रचार, त्याला चढलेला राजकीय आणि धार्मिक रंग याचाही परिणाम काश्मीर फाईल्सच्या कलेक्शनवर झाल्याचे दिसून आले होते. देशातील वेगवेगळ्या राज्यांनी काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी सुट दिली होती. यावेळी RRR ला यश मिळणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र या चित्रपटानं तो अंदाज खोटा ठरवला आहे. 600 कोटींमध्ये एस एस राजामौली यांनी RRR ची निर्मिती केल्याचे सांगितले जात आहे. RRR च्या हिंदी व्हर्जननं देखील दोनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com