'आरआरआर'चे दिग्दर्शक एस.एस.राजामौली दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांना देणार 'हे' गिफ्ट

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 14 November 2020

दिवाळी निमित्त राजामौली त्यांच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत. असं म्हटलं जातंय की दिवाळीमध्ये राम चरण आणि एनटीआर या दोघांचा एक खास व्हिडिओ रिलीज केला जाण्याचं प्लानिंग सुरु आहे.

मुंबई- बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी सिनेमाचं नाव RRR असं आहे. एनटीआर, एसएस राजामौली आणि राम चरण तेजा यांच्या RRR (Roudram Ranam Rudhiram) या सिनेमाचा एक खास व्हिडिओ २२ ऑक्टोबरला सादर केला गेला होता. या व्हिडिओमध्ये एनटीआरच्या पात्राची ओळख करुन दिली होती. यामध्ये ज्युनियर एनटीआरच्या पात्राचा परिचय करुन दिला गेला होता जो मुस्लिम पेहरावात दिसून आला होता. त्यामुळे काहीजण यामुळे नाराज झाले होते. 

हे ही वाचा: अमिताभ बच्चन यांच्या विनंतीवर स्पर्धकाने केला केबीसीच्या प्रसिद्ध ट्युनवर कथ्थक डान्स

या विषयाची चर्चा आता तसं पाहायला गेलं तर कमी झाली आहे. आता दिवाळी निमित्त राजामौली त्यांच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत. असं म्हटलं जातंय की दिवाळीमध्ये राम चरण आणि एनटीआर या दोघांचा एक खास व्हिडिओ रिलीज केला जाण्याचं प्लानिंग सुरु आहे.

rajamouli deepavali gift ,ntr news, ntr intro,RRR update,RRR fight secens,RRR news,RRR ntr fight,RRR leaks,ఆర్ ఆర్ ఆర్ లీక్స్, రాజమైమౌళి, రామ్ చరణ్, ఎన్టీఆర్, charan intro,charan rrr intro, ntr rrr intro,acharya, chiranjeevi, rrr release date

सिनेमात ज्युनियर एनटीआरची भूमिका सादर करत आधीचा व्हिडिओ रिलीज केला गेला होता. हा सिनेमा इतर भारतीय भाषांसोबतंच तेलुगु, हिंदी, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. याआधी हा सिनेमा ८ जानेवारी २०२१ ला रिलीज करणार असल्याचं सांगितलं गेलं होतं मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा सिनेमा अजुन पूर्णपणे तयार झालेला नाही. त्यामुळे आता याची प्रदर्शनाची तारिख देखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या सिनेमात बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट्टही झळकणार आहेत.   

rrr update rajamouli deepavali gift for ram charan ntr and rrr fans another video releases  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rrr update rajamouli deepavali gift for ram charan ntr and rrr fans another video releases