The Family Man : मनोज वाजपेयींच्या वेबसीरिजला संघाचा विरोध!

वृत्तसंस्था
रविवार, 29 सप्टेंबर 2019

या वेबसीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्या तोंडी काही आक्षेपार्ह संवाद असून, त्यांना कात्री लावणे गरजेचे असल्याचे मत पांचजन्यमधून मांडण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सध्या अमेझॉन प्राइमवरील 'दि फॅमिली मॅन' या वेबसीरिजला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या नियतकालिकातून आक्षेप घेण्यात आला आहे.

या वेबसीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्या तोंडी काही आक्षेपार्ह संवाद असून, त्यांना कात्री लावणे गरजेचे असल्याचे मत पांचजन्यमधून मांडण्यात आला आहे.

सध्या ओव्हर दि टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मवरून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या मालिका आणि वेबसीरिज यांच्या आशयावर कोठेतरी सॅन्सॉरचा वॉच असायला हवा, अशी अपेक्षाही या लेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

Image may contain: 2 people, people standing and text

या नियतकालिकात म्हटले आहे की, वेबसीरिजमध्ये दाखविण्यात आलेली एनआयएची महिला अधिकारी असे म्हणते की, ''स्पेशल पॉवर अॅक्टच्या नावाखाली काश्मीरमधील लोकांवर दबाव आणला जात आहे. आपण त्यांचे फोन आणि इंटरनेट सेवा बंद करत असून ते आपल्या उपकारांवर जगत असल्यासारखे वाटत नाही का? कुणाला स्वतंत्र जगू देणं हा गुन्हा नाही तर आणखी काय आहे?'' 

Image may contain: one or more people and text

एका हिंदी वृत्तपत्रामध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले वक्तव्य छापण्यात आले आहे. ज्यामध्ये तो पदाधिकारी म्हणत आहे की, जर केंद्र सरकार जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करत आहे आणि तेथील जनतेला जर मुख्य प्रवाहात आणू इच्छित आहे, तर मग ही वेबसीरिज भारत विरोधी अजेंडा तयार करण्यास बळ देत आहे. 

दि फॅमिली मॅन या वेबसीरिजची देशभर चर्चा आहे. ही वेबसीरिज मॉब लिंचिंग आणि काश्मिरमधील सद्यस्थितीवर अधोरेखित करते. एक गुप्तहेर जो सर्वसाधारण नागरिकाप्रमाणे आपले जीवन जगत असतो मात्र, तो दुसरीकडे अविश्वसनीय काम करत असतो, अशी साधारण गोष्ट या वेबसीरिजची आहे. 

Image may contain: 3 people, people smiling, car

प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी हे यामध्ये गुप्तहेराची भूमिका साकारत आहेत. मुलांना शाळेत घेऊन जाणे, घरासाठी किराणा माल, मंडईतून भाज्या खरेदी करणे अशी कामे करणारा कॉमन मॅन वाजपेयींनी साकारला आहे. कुटुंबातील लोकांना ते सरकारी नोकरी करतात, त्यामुळे त्यांना जास्त वेळ घरच्यांना देता येत नाही, असे त्यांच्या कुटुंबियांना वाटत असते. या वेबसीरिजचे वैशिष्ट्य म्हणजे देशात अचानक उद्भवलेल्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नावर त्यात भाष्य करण्यात आले आहे. 

Image may contain: 3 people, people standing

दरम्यान, मध्यंतरी नेटफ्लिक्‍सवरील 'सॅक्रेड गेम्स' या वेबसीरिजला काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- मिसेस मुख्यमंत्री मालिकेत आता समर आणि सुमीची होणार ताटातुट

- सिरियल किसर इमरान हाश्मी पहिल्यांदाच ‘या’ भूमिकेत

- Birth Anniversary : 'या' सात अभिनेत्यांनी साकारली आहे भगत सिंहांची भूमिका!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS opposition to Manoj Bajpayee web series The Family Man