विकी कौशल करतोय या हॉट अभिनेत्रीला डेट? बीटाऊनमध्ये चर्चांना उधाण!

वृत्तसंस्था
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

विकीचे नावंही आतापर्यंत काही अभिनेत्रींसोबत जोडल गेले आहे. पण आतापर्यंत त्याने त्याच्या कोणत्याच रिलेशनशिपबाबत दुजोरा दिलेला नाही. 

जगातील असंख्य मुलींचा क्रश असलेला विकी कौशल हा कोणाला डेट करतोय, त्याला कोणती मुलगी आवडते का, त्याचे अफेअर सुरू आहे का, असे अनेक प्रश्न त्याच्या फॅनगर्ल्सना पडतात. विकीचे नावंही आतापर्यंत काही अभिनेत्रींसोबत जोडल गेले आहे. पण आतापर्यंत त्याने त्याच्या कोणत्याच रिलेशनशिपबाबत दुजोरा दिलेला नाही. 

"Panipat : संजूबाबाचा 'अहमद शाह अब्दाली' बघितला का?

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, विकीची जवळीक एका अभिनेत्रीशी वाढली आहे, अशी माहिती आहे. त्या दोघांनी अजूनही आपलं नातं जाहीर केलेलं नाहीये. अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकीची जवळीक सध्या वाढली आहे. त्या दोघांनी आपण चांगले मित्र असल्याचे सांगितले होते. त्या दोघांच्या अफेअरच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र अजूनही ते दोघं अधिकृतरित्या कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नसल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी त्या दोघांमधील जवळीक वाढत आहे.

Katrina Kaif and Vicky Kaushal at Screen Awards 2018

कतरिना आणि विकीला एकमेकांसोबत वेळ घालवायला, तासंतास फोनवर बोलायला आवडतं. ते दोघं सध्या एकमेकांचा स्वभाव जाणून घेत आहेत. कोणतीही कमिटमेंट करण्याआधी त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे ते दोघं एकमेकांना वेळ देत व स्वतःसाठी वेळ घेत विचार करत आहेत. ते जगजाहीरपणे सर्वांच्या समोर येत नसले तरी त्यांना एकमेकांचा सहवास आवडतो. विकी नेहमीच कतरिनाच्या सौंदर्याचे कौतुक करत असतो. तसेच आपल्या मित्र-मंडळींमध्ये विकी कतरिनाबद्दल बोलत असतो. असे या वृत्तपत्राच्या सूत्रांनी सांगितले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Congratulations @katrinakaif and all the very best for @kaybykatrina... Shine On! #ItsKayToBeYou

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

नुकत्याच झालेल्या दिवाळीत एका पार्टीला जाताना विकी आणि कतरिना एकत्र बाहेर पडताना दिसले होते. पण या दोघांनी अद्यापही त्यांच्या कोणत्याच नात्याबद्दल उघडपणे सांगितले नसून दोघांनी आपल्या करिअरवर लक्ष देण्याचे ठरवले आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#happydiwali #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rumors of relations of Vicky Kaushal and Katrina Kaif in b town