दुखावला पाय.. पण हयगय नाय! 'गोठ'मधील राधेची कौतुकास्पद कामगिरी

टीम ई सकाळ
मंगळवार, 11 जुलै 2017

एकदा मालिका मिळाली की कलाकाराला त्याचे असे आयुष्य उरत नाही. एका ठरलेल्या चक्रात तो अडकतो. मग पाऊस असो.. वारा असो पण मालिकेचे शूट करण्यासाठी त्यांना आपली कमिटमेंट पाळावीच लागते. पण कुणाला प्रवासात लागलं, खुपलं तर मात्र सुट्टी दिली जाते. पण गोठ मालििकेत राधाचे काम साकारणारी रुपल नंद मात्र याला अपवाद ठरली. 

मुंबई : एकदा मालिका मिळाली की कलाकाराला त्याचे असे आयुष्य उरत नाही. एका ठरलेल्या चक्रात तो अडकतो. मग पाऊस असो.. वारा असो पण मालिकेचे शूट करण्यासाठी त्यांना आपली कमिटमेंट पाळावीच लागते. पण कुणाला प्रवासात लागलं, खुपलं तर मात्र सुट्टी दिली जाते. पण गोठ मालििकेत राधाचे काम साकारणारी रुपल नंद मात्र याला अपवाद ठरली. 

काही दिवसांपूर्वी एक घटना राधाची भूमिका साकारणाऱ्या रुपल नंदला अनुभवायला मिळाली. चित्रीकरण संपवून स्कूटरवरून घरी जात असताना, तिचा अपघात झाला. तिच्या उजवा हात आणि पायाला लागलं. पायातून कळा येत होत्या. तिला नीट उभंही राहाता येत नव्हतं. मात्र, रुपल स्वत: फिजिओथेरपिस्ट असल्यानं तिनं या परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिलं. न घाबरता ती तशीच गाडी चालवत घरी गेली. उजव्या पायाचा स्नायू दुखावला असल्याचं तिच्या लक्षात आलं. 
दुसऱ्या दिवशी मालिकेचं चित्रीकरण ठरलेलं होतं. तिच्या न जाण्यानं चित्रीकरण रद्द करावं लागलं असतं किंवा सिक्वेन्स बदलावा लागला असता. त्यामुळे स्वत:चं थोडेफार उपचार करून ती पुन्हा चित्रीकरणाला उपस्थित राहिली. रुपल सेटवर आल्यावर सर्वांना झालेला प्रकार कळला.  तिच्या या खंबीर वागण्याचं सर्वांनीच कौतुक केलं. 

'स्टार प्रवाह'च्या 'गोठ' मालिकेतली राधा अडचणींना खंबीरपणे सामोरी जाणारी आहे. लग्नानंतर म्हापसेकरांच्या घरी गेल्यानंतरही तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, तिनं हिंमत न हारता परिस्थितीला सामोरी गेली. त्याचाच परिणाम म्हणून राधा आणि विलास आता पती-पत्नी म्हणून जवळ आले आहेत. त्याचं नातं फुलू लागलं आहे. रुपलचा हाच स्वभाव राधेच्या अायुष्यात उतरला आहे. 

Web Title: rupal nand injured goth esakal news