Bigg Boss : टफ कंटेंडर रूपाली भोसले घराबाहेर!

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

या आठवड्यात हिना, वीणा, अभिजीत बिचुकले, आरोह आणि रुपाली नॉमिनेट झाली होती. रूपाली आणि वीणा डेंजर झोनमध्ये आले पण रुपालीला कमी मतं मिळाल्याने या आठवड्यामध्ये घरामधून बाहेर जावं लागलं.

मुंबई : बिग बॉस मराठी 2 विकेंडचा डावमध्ये अभिनेत्री रूपाली भोसले घराबाहेर पडली. बाहेर पडताना रुपाली भोसलेला तिच्या आतापर्यंच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आला. तिला एका सदस्याला वाचवायची पॉवर मिळाली येत तिने हीनाला वाचवले.

महेश मांजरेकर यांनी घरामध्ये पुन्हा एण्ट्री घेतलेल्या अभिजीत बिचुकलेपासून सगळ्यांनाच फैलावर घेतले. त्यांनी सर्व स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली. बिचुकलेने घरातील कामं करण्यास नकार दिला, यावरूनच मांजरेकरांनी त्याला कडक शब्दामध्ये खडसावले आणि कुठलंही काम करण्यात कमीपणा नसतो. घरातील नियम हे पाळावेच लागतात असा सल्ला दिला.

rupali bhosale bigg boss

शिव, वीणा आणि अभिजीत केळकरचीदेखील कानउघडणी केली. शिवला तू चांगला खेळतोस आणि बिग बॉसचा विजेता होण्याचे गुण तुझ्यात आहेत. पण, वीणाची नेहमी वकिली करत असतोस त्यामुळे तू वाईट ठरतोस आणि वीणा विक दिसते, असंही ते म्हणाले. मांजरेकरांनी शिवची आई आणि अभिजीतच्या मुलांचं कौतुक केलं.  या सगळ्यात तो महत्वाचा क्षण आला ज्यामध्ये दर आठवड्याला एका सदस्याला घराबाहेर पडणं अनिवार्य असतं.

या आठवड्यात हिना, वीणा, अभिजीत बिचुकले, आरोह आणि रुपाली नॉमिनेट झाली होती. रूपाली आणि वीणा डेंजर झोनमध्ये आले पण रुपालीला कमी मतं मिळाल्याने या आठवड्यामध्ये घरामधून बाहेर जावं लागलं. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन होईल.. स्पर्धकांना कोणते टास्क मिळणार हे पाहणं रंजक असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupali Bhosle evicted from bigg boss marathi house