रितेश पाठोपाठ या राजकीय नेत्याचा मुलगा करतोय हिरोगिरी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rupali chakankar and soham chakankar

रितेश पाठोपाठ या राजकीय नेत्याचा मुलगा करतोय हिरोगिरी..

राजकारण आणि कला क्षेत्राचे असलेले परस्परांशी असलेले आपुलकीचे नाते उघड आहे. अनेक राजकीय कार्यक्रमात कलाकार हजेरी लावतात तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना राजकीय नेते उपस्थित असतात. अनेक राजकीय नेत्यांची मुले कला क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपडत असतात. माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा मुलगाही अभिनय क्षेत्रात आला. विशेष म्हणजे त्याने अथक परिश्रमाने मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. अशी छाप उमटवणारे रितेश सारखे क्वचितच असतात. असाच प्रयत्न आणखी एका राजकीय नेत्याचा मुलगा करतो आहे.

हेही वाचा: Shiv subramaniam : अभिनेते शिव सुब्रमण्यम यांचे निधन, मुलाचेही नुकतेच..

प्रेमाची नवी भाषा, नवी कथा घेऊन ‘तू आणि मी, मी आणि तू’ चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून अभिनेता सोहम चाकणकर चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. सोहम चाकणकर हा राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा आहे. महिलांवरील अन्याय अत्याचारावर आवाज उठवून त्यांच्या न्यायासाठी उभ्या राहणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा मुलगा आता अभिनेता म्हणून नवी ओळख मिळवणार आहे.

हेही वाचा: सारा म्हणतेय 'चलो दिलदार चलो...' तर इब्राहीम... 

या चित्रपटाची कथा रोमँटिक असून सोहम या चित्रपटात गणेश नावाच्या समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारणार आहे. शिवाय सोहमचा रोमँटिक अंदाजही या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सोहमसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार हे मात्र अद्याप उघड झालेले नाही. “अभिनय क्षेत्रात येण्याची संधी देणारे चित्रपटाचे निर्माते सागर जैन आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे यांनी दिलेलं प्रोत्साहन यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. कपिल सरांनी घेतलेल्या वर्कशॉपमधून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनांमधून बरेच काही नव्याने शिकता आले. या क्षेत्रात मला बरीच उंची गाठायची आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेईन,'' अशी प्रतिक्रिया सोहमने दिली.

हेही वाचा: अभिज्ञा भावेची पतीला भक्कम साथ, कर्करोग थेरपी दरम्यान..

''आमच्या कुटुंबात कोणीही या क्षेत्रात नाही. सोहम वेगळं क्षेत्र निवडून त्यात कामगिरी करत आहे. हे पाहून खूप आनंद होतो. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोहमच्या मागे कायम आहेतच,'' अशा शब्दात रुपाली यांनी आपल्या मुलाला आर्शीवाद दिले आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Web Title: Rupali Chakankars Son Sohan Chakankar Is Starts His Career With Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top