पुरस्कार विकत घेतला : ऋषी कपूर

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रातून आपले आयुष्य खुलेआमपणे मांडले आहे. यामध्ये ऋषी कपूर यांनी 1973 मध्ये पुरस्कार विकत घेतल्याचा खुलासा केला आहे. यासाठी त्यांनी 'बॉबी' चित्रपटाचा संदर्भ दिला आहे.

1973 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात ऋषी कपूर यांना 'बॉबी' आणि अमिताभ बच्चन यांना 'जंजीर' चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. या प्रसंगानंतर आपल्याला फार अपराधी वाटल्याचेही त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

'खुल्लम खुल्ला'चे प्रकाशन नवी दिल्लीत नुकतेच झाले. त्या वेळी त्यांची पत्नी नीतू, मुलगी रिधिमा कपूर, नात आणि जावई भरत साहनी उपस्थित होते. त्यांचा मुलगा व अभिनेता रणबीर कपूर याची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती.

Web Title: rushi kapoor confesses of buying a film award