Saand Ki Aankh Trailer : शुटर दादींचा दमदार अवतार, पाहा व्हिडीओ

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

प्रसिद्ध शुटर दादींवर आधारीत असणारा 'सांड कि ऑंख' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.

मुंबई : प्रसिद्ध शुटर दादींवर आधारीत असणारा 'सांड कि ऑंख' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर एका दमदार भूमिकेसह चित्रपटासाठी सज्ज झाल्या आहेत. अनुराग कश्यप आणि निधी परमार यांच्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होती. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काही वेळातच प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. 

नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्री चक्क दादींची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. ट्रेलर पाहिल्यावर तापसी आणि भूमी यांना ओळखणे जवळपास कठीणच झाले आहे. मात्र त्यांच्या या अनोख्या भूमिकेला प्रेक्षकांकडून दाद मिळतेय.

चित्रपटाची कथा शार्पशूटर चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावातील 86 वर्षीय चंद्रो तोमर आणि त्यांची नणंद 81 वर्षाच्या प्रकाशी तोमर यांना 'रिव्हॉलवर दिदी' म्हणून ओळखलं जायचं. चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार हिरानंदानी तर निर्देशन अनुराग कश्यप आणि निधी परमार यांनी केल आहे. या चित्रपटामध्ये विनीत सिंह आणि प्रकाश झा दिसणार आहेत. याआधी सिनेमाचं नाव 'वुमनिया' असं ठेवण्यात आलं होतं. मात्र कॉपीराईटच्या मुद्द्यामुळे हे नाव बदलण्यात आलं. ट्रेलरला पसंती मिळाल्यानंतर आता प्रेक्षकांकडून चित्रपटाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या 25 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saand Ki Aankh trailer Taapsee Pannu and Bhumi Pednekar in shooter daadis role