साठाव्या वाढदिनी सचिन यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा

टीम ई सकाळ
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

अभिनेते सचिन यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी रसिकांना दिले. अभिनय, संगीत, लेखन, दिग्दर्शन आदी सर्वच विभागांमध्ये सचिन यांनी नैपुण्य मिळवले. सिनेसृष्टीत पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा काही वर्षांपूर्वी मोठा गौरवही करण्यात आला. गुरूवारी सचिन यांनी आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण केली. मुंबईत यानिमित्ताने मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सचिन तेंडूलकर, जया बच्चन, राज ठाकरे आदी दिग्गज या सोहळ्याला हजर होते. 

मुंबई : अभिनेते सचिन यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी रसिकांना दिले. अभिनय, संगीत, लेखन, दिग्दर्शन आदी सर्वच विभागांमध्ये सचिन यांनी नैपुण्य मिळवले. सिनेसृष्टीत पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा काही वर्षांपूर्वी मोठा गौरवही करण्यात आला. गुरूवारी सचिन यांनी आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण केली. मुंबईत यानिमित्ताने मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सचिन तेंडूलकर, जया बच्चन, राज ठाकरे आदी दिग्गज या सोहळ्याला हजर होते. 

सुप्रिया पिळगांवकर आणि श्रेया पिळगांवकर यांनी यावेळी सचिन यांना केक भरवला. यावेळी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मंडळी आवर्जून हजर होती. यात अब्बास मस्तान, जॅकी श्राॅफ, अली असगर, शंकर महादेवन, बाप्पा लाहिरी आदी अनेक मंडळी हजर होते. यांसह मराठीतीलही नावाजलेले कलाकार यावेळी उपस्थित होते. या वाढदिनी सचिन यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत असणार आहे. अभिनेत्रीची निवड अद्याप झालेली नाही. जवळपास चार वर्षांनंतर सचिन पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळले आहेत. त्यांनी एकुलती एक या चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातून त्यांची मुलगी श्रेया पिळगांवकर रूपेरी पडद्यावर अवतरली. 

Web Title: Sachin pilgaonkar birtha day esakal news