Sachin Pilgaonkar: तीच केमिस्ट्री, तोच उत्साह.. ३९ वर्षांनी या लोकप्रिय गाण्यावर थिरकले सचिन - सुप्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Sachin Pilgaonkar, supriya pilgaonkar, zee chitra gaurav awards 2023

Sachin Pilgaonkar: तीच केमिस्ट्री, तोच उत्साह.. ३९ वर्षांनी या लोकप्रिय गाण्यावर थिरकले सचिन - सुप्रिया

Sachin Pilgaonkar - Supriya Pilgaonkar Viral Video: 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२३' लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना अनेक सरप्राईज बघायला मिळणार आहेत.

झी चित्र गौरव पुरस्कार २०२३ मध्ये आणखी एक खास गोष्ट बघायला मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी जोडी सचिन - सुप्रिया 'झी चित्र गौरव पुरस्कार' निमित्ताने तब्बल ३९ वर्षांनी त्यांच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स करणार आहेत.

'झी चित्र गौरव पुरस्कार २०२३' चं बिगुल वाजलं आहे. नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत सचिन - सुप्रिया एकमेकांसोबत डान्स रिहर्सल करताना दिसत आहेत.

आणि पुढच्याच सेकंदाला हे दोघेच 'झी चित्र गौरव पुरस्काराच्या रंगमंचावर डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं म्हणजे 'हि नवरी कसली'. १९८४ साली आलेल्या नवरी मिळे नवऱ्याला या गाजलेल्या सिनेमात या दोघांनी हि नवरी कसली गाण्यावर डान्स केला होता.

आता याच गाण्यावर तब्बल ३९ वर्षांनी सचिन - सुप्रिया थिरकणार आहेत. दोघांचा 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल झाला असून तीच केमिस्ट्री, आणि तोच उत्साह दोघांमध्ये दिसतोय.

हा व्हिडिओ दिसताच सचिन - सुप्रियाच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. अनेकांनी कमेंट करत सचिन - सुप्रियाचा डान्स पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.

यंदाचा 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२३' खास असणार आहे. साऊथ इंडस्ट्रीतील मोठी स्टार अभिनेत्री रश्मीका यंदा 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२३' मध्ये सहभागी होणार आहे, मराठी लावणीवर ठुमके लगावताना रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

झी मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात रश्मिकानं लावणीवर धडाकेबाज डान्स केला आहे. त्याची छोटी झलक साऱ्यांनी पाहताच समस्त मराठीजनांचे मन जिंकून गेली.