Sachin Tendulkar Birthday: "देव कसा दिसतो?", मराठमोळ्या रील स्टारने दिलं असं गिफ्ट की सचिन म्हणाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin tendulkar, sachin tendulkar birthday, lata mangeshkar, focusedindian, karan sonawane, neel salekar

Sachin Tendulkar Video: "देव कसा दिसतो?", मराठमोळ्या रील स्टारने दिलं असं गिफ्ट की सचिन म्हणाला..

Sachin Tendulkar Got Birthday Gift by Reel Star Focused Indian News: आज क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा वाढदिवस. सचिन तेंडुलकरला केवळ भारतातील नाही तर जगभरातले तमाम चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अशातच मराठमोळा इन्फ्लूएंसर आणि रील स्टार करण सोनावणे अर्थात FocusedIndian याने त्याच्या गॅंग सोबत सचिनची भेट घेतली. आणि त्याला खास गिफ्ट दिलं. हे गिफ्ट पाहून सचिनला आश्चर्याचा धक्का बसला. काय घडलं पाहूया..

(Sachin Tendulkar as a gift given by the reel star focusedindian karan sonawane and neel salekar)

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सचिन तेंडुलकर सध्या IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमशी संबंधित आहे. सचिन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना त्याचं खास मार्गदर्शन करत असतो.

अशातच सचिनच्या बर्थडे निमित्ताने मराठमोळे रील स्टार करण सोनावणे, नील सालेकर, शुभम जाधव असे अनेक इन्फ्लूएंसर सचिनला स्टुडिओत भेटायला गेले होते. सचिनने त्यांच्यासोबत छान आणि गमतीशीर वेळ घालवला.

सगळे सचिन सोबत फोटो काढायला उभे होते. तेव्हा सचिन म्हणाला.."सगळे एवढे सिरीयस आहेत की जणू काही आता मैदानात मॅच खेळायचीय..." असं म्हणताच सगळे खळखळून हसायला लागले. पुढे करणने सचिनसाठी खास गिफ्ट आणलं होतं.

त्या गिफ्ट मध्ये एक आरसा होता. ते गिफ्ट उघडताच करण म्हणाला.."तुम्हाला दाखवायचं होतं कि देव कसा दिसतो."

आणि सचिन आरशात पाहून "अरे बापरे" म्हणाला. करणच्या बाबांनी त्याला सचिनसाठी काहीतरी खास गिफ्ट घेऊन जायला सांगितलं होतं.

विशेष गोष्ट म्हणजे हे सर्व संभाषण मराठीत झालं. करणने दिलेल्या फ्रेमवर सचिनने Keep Shining असा संदेश लिहीत त्याची सही केली.

तब्बल दोन दशके क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे हसतमुखाने वाहिल्यानंतर सचिन निवृत्त झाला.

त्याच्या निवृत्तीबरोबर अनेक चाहत्यांनी देखील टीव्हीसमोर तासंतास बसून सामना पाहण्यातून निवृत्ती घेतली. असा हा लाडक्या तेंडल्या आज (24 एप्रिल) 50 वर्षांचा होत आहे.