सचिन तेंडूलकरच्या चाहत्यांसाठी, त्याच्या वाढदिवशी 'सचिन द बिलियन ड्रीम्स'ची खास भेट

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Friday, 24 April 2020

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेक विश्व विक्रम केलेले आहेत. सचिन फिल्ड वर खेळायला आला की प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन त्याची खेळी पाहतात. सचिनचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक जण त्याला आपला आदर्श मानतात..

मुंबई- सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या महा-रोगराईमुळे लॉकडाऊन सुरु आहे..हा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी अत्यावश्यक सेवा सोडून इतर कोणत्याच गोष्टींना परवानगी देण्यात आलेली नाही..सामान्यांपासून ते खास व्यक्तीपर्यंत सर्वांनाच लॉकडाऊनमुळे घरात बसावं लागलं आहे...या लॉकडाऊन दरम्यान अनेकजण आपला वाढदिवस देखील घरातल्या घरात साजरा करत आहेत.. आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा वाढदिवस आहे..

हे ही वाचा: विद्या बालनने बनवला तिचा आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ  

सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातील वंडर बॉय आहे. खूप लहान असल्यापासून त्याने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि अख्या जगाला त्याचं वेड लागलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेक विश्व विक्रम केलेले आहेत. सचिन फिल्ड वर खेळायला आला की प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन त्याची खेळी पाहतात. सचिनचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक जण त्याला आपला आदर्श मानतात..

Sachin Tendulkar turns 45, fans celebrate birthday outside his ...

सचिन तेंडूलकरच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांची गर्दी त्याच्या घरा बाहेर असते. पण यंदाची कोविड-१९ मुळे निर्माण झालेली ही गंभीर परिस्थिती पाघता त्याचे चाहते त्याच्या पर्यंत पोहचू शकणार नाहीयेत आणि म्हणूनच सोनी मराठी वाहिनीवरून सचिन स्वतः त्याच्या चाहत्यांना भेटायला येणार आहे.

सर्वांच्या लाडक्या सचिनच्या वाढदिवसानिमित्त सोनी मराठी वाहिनीने त्याला एक अनोखी सलामी देत 'सचिन द बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाचं प्रक्षेपण 24 एप्रिलला दुपारी 3 वाजता ठेवलं आहे. तमाम सचिन प्रेमी आणि क्रिकेट प्रेमींसाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच आहे. सचिनचा आतापर्यंतचा प्रवास या चित्रपटात उलगडला आहे. सोनी मराठी वाहिनी बरोबरच सोनी मॅक्स वाहिनीवर देखील हा चित्रपट 24 एप्रिल, दुपारी 3 वा. प्रदर्शित होईल..  

on sachin tendulkars birthday sony marathi is showing sachin the billion dreams film for his fans  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on sachin tendulkars birthday sony marathi is showing sachin the billion dreams film for his fans