Sacred Games 2 : 'जंग का वक्त आया है; गायतोंडे पुन्हा येतोय!

टीम ईसकाळ
मंगळवार, 9 जुलै 2019

त्रिवेदी आणि त्रिपाठी या रहस्यमय या पात्रांबद्दल उलगडा होणार का? 25 दिवसांत काय होणार? ताबुत काय असतो? अशा प्रेक्षकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या सिझनमध्ये मिळतील.

गेल्या काही दिवस पसणारी अफवा अखेर आज सत्यात उतरली आहे. 'सॅक्रेड गेम्स 2' ही वेबसिरीज अखेर 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतीये. 'नेटफ्लिक्स इंडिया'च्या अधिकृत अकाऊंटवर 'सॅक्रेड गेम्स 2'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणेश गायतोंडे जिवंत आहे आणि पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देत 'जंग का वक्त आया है' असं म्हणतोय.

त्रिवेदी आणि त्रिपाठी या रहस्यमय या पात्रांबद्दल उलगडा होणार का? 25 दिवसांत काय होणार? ताबुत काय असतो? अशा प्रेक्षकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या सिझनमध्ये मिळतील. ट्रेलरच्या प्रथमदर्शनी बंटी आणि गायतोंडे दिसतात. दिलबाग सिंग, त्रिवेदी आणि गायतोंडे यांच्या भोवती ही कहाणी फिरणार आहे. या भागात अभिनेत्री कल्की कोचलीन आणि रणवीर शौरी हे दोन नवे चेहरे दिसणार आहेत.

पहिल्या भागात नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान आणि पंकज त्रिपाठी यांनी हा सिझन गाजवला होता. आता ही कथा पुढे जाऊन याबद्दलचा उलगडा होणार आहे. ही वेबसिरीज विक्रम चंद्रा यांच्या 'सॅक्रेड गेम्स' या कादंबरीवरून निर्मित करण्यात आली आहे. 'कभी कभी लगता है अपुनीच भगवान है' हा गायतोंडेचा डायलॉग फेमस झाला होता. 

sacred games 2


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sacred Games 2 trailer released