'प्रेमाची गोष्ट'नंतर आता सागरिका घाटगे 'डाव' या चित्रपटात

टीम ई सकाळ
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

‘चक दे इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आगमन करीत पदार्पणातच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेली मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे पुन्हा एका मराठी चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये आली आहे. हिंदीसोबतच मराठीतही अभिनय करणारी सागरिका 'डाव' या आगामी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करीत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटानंतर डाव हा सागरीकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे.

मुंबई : ‘चक दे इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आगमन करीत पदार्पणातच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेली मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे पुन्हा एका मराठी चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये आली आहे. हिंदीसोबतच मराठीतही अभिनय करणारी सागरिका 'डाव' या आगामी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करीत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटानंतर डाव हा सागरीकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे.

नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली डावची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सस्पेंस-थ्रीलरपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनीच लिहिली आहे. संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत तर मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे. मराठी चित्रपट रसिकांना सायको किलिंगचा अनुभव देणाऱ्या डावमध्ये सागरीकाने मुख्य भूमिका साकारली असून,आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा या चित्रपटातील भूमिका खूपच वेगळी आहे. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून, डाव हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल असे सागरिका मानते.

आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवादलेखन, सहजसुंदर अभिनय, प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत आणि त्याला साजेसं सादरीकरण या सर्वांचा मिलाफ घडवणाराडाव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: sagarika ghatage new marathi movie Daav esakal news