साहिलचे दिले फिटनेस फंडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

साहिलने नुकतेच "बीच बॉडी कार्निवल सीजन 2' या फिटनेस इव्हेंटमध्ये उपस्थिती दर्शविली होती.

मुंबई : स्टाईल चित्रपटातून बॅालिवुडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता साहिल खान हा आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीत जरी त्याने खास काही कामगिरी केली नसली तरी त्याचे फिटनेस सेंटर्सशी चर्चा देशभरात आहे.

साहील नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. फिटनेसबाबत जागरूक असणाऱ्या साहिलने नुकतेच "बीच बॉडी कार्निवल सीजन 2' या फिटनेस इव्हेंटमध्ये उपस्थिती दर्शविली होती.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम निक आर्टन यांच्याद्वारे परदेशात प्रदर्शित केला जात होता. मात्र, साहिलने या कार्यक्रामाला भारतात प्रदर्शित करणे पसंत केले. त्याने या वेळी स्पर्धकांना वर्कआऊटचे विविध फंडेही सांगितले. "भारतात होणाऱ्या या बीच बॉडी इव्हेंटसाठी मी फारच उत्साही आहे. या इव्हेंटदरम्यान स्पर्धकांचाही उत्तम प्रतिसाद पाहून फारच आनंद झाला.' असे साहिलने सांगतो. या वेळी त्याने स्पर्धकांना फिटनेस टिप्स दिल्या आणि त्या स्पर्धकांसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sahil khan gave fitness mantra