महेश मांजरेकरची लेक, कोणाला करतीये डेट?

महेश मांजरेकरची लेक, कोणाला करतीये डेट?

बॉलिवूडमध्ये डेटिंगचा खेळ नेहमीच अव्वल असतो. सुत्रांनुसार, महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर, जिने 2019 मध्ये सलमान खानच्या दबंग 3 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती सध्या साजिद नाडियादवालाचा मुलगा सुभान नाडियाडवालाला डेट करत आहे. (Bollywood Updates: Sai Manjrekar is dating Subhan Nadiadwala)

सुभान नाडियादवालाचे वडील साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala) हे प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आणि नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटचे मालक आहेत. आता त्यांचा मुलगा, सुभान दिग्दर्शक होण्यास सज्ज आहे.

वरवर पाहता, सुभान आणि सईची भेट सलमान खानच्या (Salman Khan) माध्यमातून झाली होती आणि सलमान खानचे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि साजिद नाडियादवाला यांच्याशी अप्रतिम संबंध आहेत, त्यामुळे वारंवार होणाऱ्या कौटुंबिक भेटीमुळे सई आणि सुभान एकमेकांच्या अगदी जवळ आले. ते सुरुवातीला चांगले मित्र बनले आणि डेटिंगला सुरुवात केली. दोघेही एकमेकांबद्दल खूप गंभीर आहेत आणि कुटुंबांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती देखील आहे. सई आणि सुभान अनेकदा वीकेंडला एकमेकांच्या घरी जाताना दिसले आहेत. अभिनेत्रीने अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेले नाही.

मांजरेकर आणि नाडियाडवालांचेही चांगले संबंध आहेत. इतर कोणत्याही बॉलीवूड जोडप्याप्रमाणे, आशा आहे की सई आणि सुभान देखील लवकरच त्यांचे नाते अधिकृत करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com