पाच वर्षांच्या तैमूरनं चक्क सैफवर उगारला हात;नेटकऱ्यांनी काढले संस्कार

सैफ अली खान आणि तैमूर अली खान यांच्या व्हायरल व्हिडीओवर ताशेरे ओढले जात आहेत.
Saif Ali khan, Kareena Kapoor Khan & Taimur Ali Khan
Saif Ali khan, Kareena Kapoor Khan & Taimur Ali KhanGoogle

बॉलीवूडचं स्टार कपल म्हणून करिना कपूर(Kareena Kapoor) आणि सैफ अली खान(Saif Ali khan) नेहमीच चर्चेत असतात. पण त्याहीपेक्षा त्यांची दोन मुलं म्हणजे तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान हे अधिक चर्चेत असतात. तैमूर तर जरा जास्तच पॉप्युलर स्टार किड आहे,जो आपल्या क्युट वागण्यानं नेहमीच लाइमलाइट मध्ये असतो. त्याचे अनेक फोटो,व्हिडीओ चाहत्यांची वाहवा मिळवून जातात. पण आता असं अचानक काय झालं की तैमूरच्या एका हरकतीवर सोशल मीडियावर सर्वच स्तरातून राग व्यक्त केला जात आहे.

सध्या एक व्हिडीओ जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हायरल व्हिडीओ आम्ही इथे बातमीत जोडलेला आहे. ज्यामुळे आपल्याला एकंदरीत सगळ्याच परिस्थितीचा अंदाज येईल. त्याचं झालं असं की,रविवारी ६ मार्च,२०२२ रोजी करिना,सैफ तैमूर(Taimur Ali Khan) सोबत बाहेर निघाले होते. त्यावेळी सैफनं तैमूरचा हात पकडून त्याला गाडीत बसवलं. पण तितक्यात तैमूर पुन्हा सैफच्या मागे धावत आला आणि त्याच्यावर हात उगारला. त्यावेळी सैफनं पटकन मागे होत त्याच्याकडे रागाने पाहिलं खरं,पण या छोटा नवाबाचा राग पारावर पोहोचला होता. तो वडिलांच्या अंगावर धावून जात होता.

Saif Ali khan, Kareena Kapoor Khan & Taimur Ali Khan
Photo:सई ताम्हणकर 'द चॉकलेट गर्ल'

आता नेहमीच लाइमलाइटमध्ये असणाऱ्या तैमूरची ही चुकीची वागणूक कॅमेऱ्यानं टिपली अन् मग काय...या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. थेट करिना-सैफच्या संस्कारांवर बोट ठेवत नेटकरी म्हणाले,''मुलाला शिस्त शिकवा जरा''. आता यामुळे करिना-सैफला थोडं वाईट वाटेल म्हणा,पण यामुळे आपल्या व्यस्त शेड्युलमधनं वेळ काढीत जरा तैमूरचं वागणं सुधारावं यासाठी ते प्रयत्न करतील अशी आशा बाळगूया. नाहीतर ग्लॅमरच्या दुनियेत डोक्यात हवा गेली तर सगळंच गणित बिघडतं. तेव्हा आताच 'छडी लागे छमछम,विद्या येई घमघम' असं करिना-सैफने अधनंमधनं तैमूरसोबत वागायला हवं. म्हणजे आता सगळ्यां समक्ष नाचक्की झाली तशी पुन्हा होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com