"सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत वाईट किस"; सैफने सांगितला अनुभव | Saif Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saif Ali Khan, Rani Mukerji

"सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत वाईट किस"; सैफने सांगितला अनुभव

अभिनेता सैफ अली खान Saif Ali Khan आणि अभिनेत्री राणी मुखर्जी Rani Mukerji हे बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. आगामी 'बंटी और बबली २' या चित्रपटात या दोघांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याआधी 'हम तुम' Hum Tum या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने 'हम तुम' चित्रपटातील राणीसोबतच्या किसिंग सीनचा किस्सा सांगितला. यश राज फिल्म्सच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये राणी सैफला विचारते, "तो किसिंग सीन करताना आपण दोघंही किती घाबरलो होतो, तुला आठवतंय का?" त्यावर सैफ म्हणतो, "तू तो सीन शूट करण्यासाठी किती घाबरलेली होती, हे मला नीट आठवतंय." चित्रपटातील किसिंग सीन टाळण्यासाठी आणि दिग्दर्शकांना नकार देण्यासाठी राणी सैफचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. सेटवर काही दिवस ती दररोज सैफला खूप चांगली वागणूक देत होती. "अचानक ही माझ्यासोबत इतकं चांगलं का वागतेय, हा प्रश्न मलाही पडला होता", असं सैफ म्हणाला. मला हा किसिंग सीन करायचा नाही, हे तू दिग्दर्शकांना सांग, असं राणी सैफला सांगत होती. मात्र त्यावरून सैफसुद्धा तिची फिरकी घेत होता. "माझा बॉस मला जे करायला सांगेल, ते मी करेन. मी का नकार देऊ", असं तो तिला म्हणाला.

हेही वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेत होणार 'या' दिग्गज कलाकाराची एण्ट्री

"सिनेसृष्टीच्या इतिहासातील तो सर्वांत वाईट किस होता. कारण तू संकोचल्यासारखं वागत होती. म्हणून मलासुद्धा संकोचल्यासारखं झालं", असं सैफने पुढे राणीला सांगितलं. या व्हिडीओमध्ये सैफ आणि राणीने त्यांच्या मैत्रीचेही किस्से सांगितले. "गेल्या १७ वर्षांत आम्हा दोघांच्या गप्पांचेही विषय बदलले. आता आम्ही आमची मुलं, आदिरा, तैमुर यांच्याविषयीच जास्त बोलतो," असं राणी म्हणाली.

२००८ मध्ये राणी आणि सैफने 'थोडा प्यार थोडा मॅजिक' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. 'बंटी और बबली २' या चित्रपटाचं दिग्दर्शन वरूण शर्माने केलं असून यामध्ये राणी आणि सैफसोबतच सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी वाघ आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

loading image
go to top