सैफ-सोहा वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवरनं आमने-सामने?

करिना आणि कुणाल खेमूनंही वादात घेतली उडी....
Saif Ali Khan,Soha Ali Khan,Karena Kapoor-Khan,Kunal Khemu
Saif Ali Khan,Soha Ali Khan,Karena Kapoor-Khan,Kunal Khemugoogle

सैफ अली खान(Saif Ali Khan) आणि सोहा अली खान(Soha ALi Khan) हे दोघे सख्खे बहिण-भाऊ. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी या दोघांची ही दोन मुलं. यांना आणखी एक मुलगी तिचं नाव सबा अली खान. सैफ,सोहानं फिल्म इंडस्ट्रीत करिअर करणं पसंद केलं तर सबा मात्र फिल्म इंडस्ट्रीपासून नेहमीच दूर राहिली. तिचा स्वतःचा ज्वेलरी डिझायनिंगचा व्यवसाय आहे. पण सिनेमांव्यतिरिक्त सैफ-सोहा एकत्रितपणे 'पतौडी हाऊस' या कपड्याच्या ब्रॅंडचे ओनर आहेत. आता पतौडी खानदान म्हणजे नवाब खानदान. मोठं घर,गडेजंग संपत्ती म्हणजे एकूण मोठा थाटमाट. हरयाणामधील त्यांचं खानदानी पतौडी हाऊस हे एखाद्या पॅलेसपेक्षा कमी नाही. सैफ अली खान अनं करिना कपूर आपल्या मुलांसोबत अनेकदा तिथं फॅमिली टाईम एन्जॉय करायला जातात. तर सोहा अली खानही मुलगी इनाया आणि पती कुणाल खेमूसोबत अनेकदा पतौडी हाऊसमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसते. कधीकधी तर या बहिण-भावाचं अख्ख कुटुंब एकत्रित तिथे मी टाईमचा आनंद घेतात.

Saif Ali Khan,Soha Ali Khan,Karena Kapoor-Khan,Kunal Khemu
'संजयला जेल झाली अन् 'खलनायक' सुपरहीट झाला';सुभाष घई असं का म्हणाले?

या बहिण-भावात अगदी घट्ट नातं आजपर्यंत पहायला मिळालं होतं. पण नेमकं कुठे माशी शिंकली की अचानक वारसा हक्कावर बोलायची वेळ या दोघांवर आली. शेवटी पैसा नात्यात आला अनं सगळं विस्कटलं म्हणायचं.तर त्याचं झालं असं की सोहा अली खाननं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत या वारसाहक्कावरून चाललेल्या घरातील मुद्द्यावर नुकतंच एक भाष्य केलंय ज्यावरून चर्चेला सुरुवात झालीय. सोहा अली खानला विचारलं गेलं की, ''तु,कुणाल,करिना,सैफ जेव्हा डिनरसाठी एकत्र बसता तेव्हा तुमच्यात कुठल्या गप्पा रंगतात?''

Saif Ali Khan,Soha Ali Khan,Karena Kapoor-Khan,Kunal Khemu
डॅशिंग अक्षयचा वाघासोबतचा थ्रीलिंग व्हिडीओ पाहिलात का?

तेव्हा सोहाने जे उत्तर त्यावर दिलं ते ऐकून सगळेच थक्क झाले. सोहा म्हणाली,''वारसा या एकाच मुद्दयावर आमच्यात चर्चा होते. आमच्याकडे खानदानी कोणत्या गोष्टी आहेत. ज्याआम्हाला आमच्या पुर्वजांमुळे मिळाल्या आहेत. त्याचं मोजमाप आम्ही करतो. कुणाल आणि करिनाही त्यात खूप इटरेस्ट घेतात''. असं सांगत सोहा हसली. अर्थात सोहानं जरी हे विनोदाचा भाग म्हणून सांगितलं असलं तरी ऐकणाऱ्यांमध्ये मात्र कुजबूज सुरू झालीय. लोकं म्हणतायत,पैशावरून भावंडांमध्ये वाटाघाटीच्या चर्चा सुरू झाल्यात की काय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com