सईचा वाढदिवस आणि तळजाई पठारावरची हिरवाई...

टीम इ सकाळ
रविवार, 25 जून 2017

आपल्या आवडत्या कलाकाराचा वाढदिवस साजरा करायला कुणाला नाही आवडणार? अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांच्या वाढदिनी शेकडो चाहते आपले काम धंदा सोडून त्याच्या घरासमोर गर्दी करतात. त्यांची एक झलक मिळावी म्हणून तिष्ठत उभे रहातात. पण आपले मराठी चाहते मात्र याला अपवाद आहेत. आपल्या कलाकाराचा वाढदिवस तर साजरा व्हायला हवा पण सामाजिक जाणीवही जपली गेली पाहिजे, असा हट्ट धरून सई ताम्हणकरच्या सोशल साइटवरच्या पुण्याच्या चाहत्यांनी एक आगळा आदर्श घालून दिला आहे. 

पुणे: आपल्या आवडत्या कलाकाराचा वाढदिवस साजरा करायला कुणाला नाही आवडणार? अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांच्या वाढदिनी शेकडो चाहते आपले काम-धंदा सोडून त्याच्या घरासमोर गर्दी करतात. त्यांची एक झलक मिळावी म्हणून तिष्ठत उभे रहातात. पण आपले मराठी चाहते मात्र याला अपवाद आहेत. आपल्या कलाकाराचा वाढदिवस तर साजरा व्हायला हवा पण सामाजिक जाणीवही जपली गेली पाहिजे, असा हट्ट धरून सई ताम्हणकरच्या सोशल साइटवरच्या पुण्याच्या चाहत्यांनी एक आगळा आदर्श घालून दिला आहे. 

25 जून हा सईचा वाढदिवस असतो. या दिवशी सई मुंबईत होती. पण इकडे तिच्या सईहोलिक्स या ग्रुपने मात्र एक योजना आखली. या दिवशी सईने पुण्यात यावे असे सर्वांना वाटत होते. पण पूर्वनियोजित कामामुळे तिला येता आले नाही. तरी सईचा हा वाढदिवस स्वराज्य प्रतिष्ठान आणि सईहोलिक्स यांनी साजरा केला. यावेळी केक तर कापण्यात आलाच. पण तळजाई या पठारावर तब्बल 50 झाडे लावण्यात आली. जवळपास 25 कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडून त्यांनी सईला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, सई तिथे येऊ जरी शकली नाही, तरी तिने केलेल्या फेसबुक लाईव्हवेळी त्याची दखल घेतली. सकाळी 11 ते 1 या वेळेत ही झाडे लावण्यात आली. आरजे सोनालीही यात सहभागी झाली होती. 

करंज, कांचन आणि जांभूळ या झा़डांचा यात समावेश होतो. नगरसेवक महेश वाबळे यांनीही या कामी सहकार्य केले. 

 

 

Web Title: saiholics tree plantation esakal news

टॅग्स