सायना नेहवालने दिल्या परिणीतीला शुभेच्छा !

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ट्विटरवरुन अभिनेत्री परिणीती चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आता लवकरच बायोपिक तयार होत आहे. क्रिडाक्षेत्रातील आजवरचा प्रवास आणि तिच्या कारकीर्दीवर बॉलिवूडमध्ये बायोपिक तयार होणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला 11 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत झळकणार आहे. लवकरच चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार असल्याने सायनाने परिणीतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटरवरुन सायनाने परिणीतीच्या लुकचा फोटो शेअर केला. त्याचसोबत परिणीती आणि चित्रपटाच्या संपूर्ण टिमला शुभेच्छा देताना ट्विट केलं आहे. ट्विट करताना लिहिलं आहे, ' या प्रवासामध्ये एकत्र चालण्यासाठी तयार आहे. टीमला माझ्याकडून शुभेच्छा'. सायनाने या ट्विटमध्ये #SainaNehwalBiopic असा हॅशटॅगही वापरला आहे.  बायोपिकचं दिग्दर्शन अमोल गुप्ते करीत आहेत. तर चित्रपटाचं निर्देशन भूषण कुमार करणार आहेत. अमोल गुप्ते यांनी याआधी  ‘स्टॅनली का डब्बा’ आणि ‘हवा हवाई’ या चित्रपटांच दिग्दर्शन केलं आहे. परिणीती गेल्या सहा महिन्यांपासून बॅडमिंटनची तयारी करीत आहे अशी माहिती अमोल गुप्ते यांनी दिली. विशेष म्हणजे ती मुंबईतील ठाण्यामधील त्याच कोर्टमध्ये प्रॅक्टीस करीत आहे ज्यामध्ये सायना ट्रेनिंग घेत होती. 

मी खूप आनंदी आणि नर्वसही आहे...
या चित्रपटाविषयी मत व्यक्त करताना परिणीती म्हणाली,' हा प्रोजेक्ट माझ्यासाठी अत्यंत खास आहे. अमोल सर आणि त्यांची अखंड टीम माझी खूपच काळजी घेत आहेत. फिजीयो आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू मला ट्रेन करत आहेत. सायना कशी खेळते हे शिकवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मी अतीशय आनंदी आहेच पण, त्याचसोबत नर्वसही आहे.'

सायना नेहवाल 2015 मध्ये वल्ड चॅम्पियन झाली. त्यानंतर अमोल गुप्ते यांनी सायनाची ऑटोबायोग्राफी वाचायला सुरुवात केली. सायनाची कथा मोठ्य़ा पडद्यावर आणण्यासाठी त्यांना चार वर्षांचा कालावधी लागला. चार महिन्यांमध्ये या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, 2020 मध्ये पार पडण्याऱ्या ऑलंपिक गेम्सच्याआधी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Me. All day everyday nowadays

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

चित्रपटाच्या शुटिंगला 11 सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. चित्रपटाच्या नावाविषयी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परिणीतीच्या आधी श्रद्धा कपूर सायनाची भूमिका साकारणार होती. मात्र काही कारणांमुळे तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला. परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रॅक्टिस दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Post training bliss!  #Saina

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

वर्कफ्रंटविषयी बोलायचं तर परिणीती 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय 'संदीप और पिंकी फरार' या चित्रपटामधूनही ती लवकरच झळकणार आहे ज्यामध्ये परिणीतीसह अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन आणि परिणीती ही जोडी याआधी 'इशकजादे' आणि 'नमस्ते इंग्लंड' या चित्रपटांमध्ये एकत्र दिसली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saina Nehwal Sends Best Wishes to Parineeti Chopra