साजिद नाडियावाला, किच्चा सुदिप 'चेकमेट'; चेस पॉलिसीचं केलं उल्लंघन

त्या स्पर्धेत त्यांनी खोडसाळपणा केल्याचा आरोपही कामथ यांच्यावर करण्यात आला होता.
sajid nadiawala and kichha sudip
sajid nadiawala and kichha sudip Team esakal

मुंबई - भारतातील सर्वात कमी वयाचे अब्जाधीश वन बीकनचे संस्थापक निखिल कामत (nikhil kamat) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी कोविड 19 चॅरिटी चेस स्पर्धेचे आयोजन केले होते. कामत यांनी या स्पर्धेत विश्वविजेता विश्वनाथन आनंद (याचा पराभव केला होता. मात्र त्या स्पर्धेत त्यांनी खोडसाळपणा केल्याचा आरोपही कामथ यांच्यावर करण्यात आला होता. त्याची कबूलीही कामत यांनी दिली आहे. मात्र आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (sajid nadiadwala and kichcha sudeep banned from online chess platform )

आता चेस डॉट कॉमनं (chess.com platform) प्लेटफॉर्मने फ्लेअर पॉलिसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्माता साजिद नाडियावाला आणि अभिनेता किच्चा सुदिप यांना धक्का दिला आहे. या दोन्ही सेलिब्रेटींवर आता बंदी घालण्यात आली आहे. 13 जून रोजी प्लॅटफॉर्मनं चेकमेट कोविड 19 रिलिफ फंडिंगसाठी एका प्रदर्शनी सामन्याचे आय़ोजन केले होते. त्या 4 तास 30 मिनिटांच्या स्पर्धेत 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली होती. या स्पर्धेमध्ये ग्रँण्ड़मास्टर विश्वनाथन आनंद आणि आणखी नऊ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

त्या नऊ स्पर्धकांमध्ये निखिल कामत, यजुवेंद्र चहल, किच्चा सुदिप, साजिद नाडियावाला, रितेश देशमुख, आमिर खान, अरिजित सिंग, अनाया बिर्ला आणि मनु कुमार जैन यांचा सहभाग होता. विश्वनाथन आनंद यांनी य़ावेळी आठ मॅच जिंकले. मात्र निखिल कामत यांनी त्यांचा पराभव केला होता....मात्र त्यात त्यांनी चिटिंग केल्याची बाब समोर आली आहे. तसेच साजिद नाडियावाला आणि किच्चा सुदिप यांनी देखील खेळाच्या नियमांचा भंग केला आहे.

sajid nadiawala and kichha sudip
Directors Special; बॉलीवूडमधल्या दिग्गज दिग्दर्शकांची समोसा पार्टी

त्यामुळे त्यांच्यावर संघटनेच्या वतीनं आता बंदी घालण्यात आली आहे. यासगळ्या प्रकरणावर विश्वनाथन आनंद यांनी व्टिट केले आहे. त्यांनी म्हटलंय, कोरोनाग्रस्तांसाठी चेसच्या एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. त्यात गंमत आणि रंगत आणली. मी माझ्यावतीनं सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करुन स्पर्धा पूर्ण केली. इतरांकडूनही अशी अपेक्षा होती. आनंद यांनी हे व्टिट निखिल कामत यांच्या व्टिटनंतर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com