आर्ची-परशा, सचिन-सुप्रिया, अशोकमामा येणार 'ई सकाळ'वर लाईव्ह

टीम ई सकाळ
शुक्रवार, 23 जून 2017

पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदीर या नाट्यगृहाचे योगदान कमालीचे मोठे आहे. तब्बल 50 वर्षे हे नाट्यगृह रसिकांची सेवा बजावते आहे. यंदा या नाट्यगृहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. 24 जून ते 28 जून या काळात हा साेहळा होईल. या पाच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते आहे. यावेळी रोहिणी हट्टंगडी यांना माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवाय अनेक कलाकारांच्या मुलाखतीचेही आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती जगभरातील ई सकाळच्या वाचकांना लाईव्ह पाहता येतील

पुणे: पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदीर या नाट्यगृहाचे योगदान कमालीचे मोठे आहे. तब्बल 50 वर्षे हे नाट्यगृह रसिकांची सेवा बजावते आहे. यंदा या नाट्यगृहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. 24 जून ते 28 जून या काळात हा साेहळा होईल. या पाच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते आहे. यावेळी रोहिणी हट्टंगडी यांना माजी केंद्रीय मेत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवाय अनेक कलाकारांच्या मुलाखतीचेही आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती जगभरातील ई सकाळच्या वाचकांना लाइव्ह पाहता येतील.

सैराटफेम रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नागराज मंजुळे, सचिन व सुप्रिया पिळगावकर, अशोक व निवेदिता सराफ, अभिनेते मोहन जोशी, सचिन खेडेकर, रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक यांसह केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री व ख्यातमान कवी रामदास आठवले यांचे हास्य कवि संमेलनही होणार आहे. हे सर्व कार्यक्रम जगभरातील ई सकाळच्या वाचकांना लाईव्ह पाहता येतील. 

बालगंधर्व सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याची सुरुवात शोभायात्रेपासून होणार आहे. यात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, दिप्ती देवी हे कलाकार सहभागी होणार आहेत. या यात्रेचा काही भागही इ सकाळच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहता येतील. 25 जूनला सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सैराट टीमच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, नागराज मंजुळे आणि निखिल साने या कार्यक्रमात रसिकांशी संवाद साधतील. 26 जूनला केवळ महिलांसाठी लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी वर्षा उसगांवकर, पूजा पवार, आमदार मेधा कुलकर्णी आणि अमृता देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असेल. दुपारी साडेबारा ते साडेतीन या वेळेत तो होईल. 27 जूनला साडेपाच ते सात या वेळेत अभिनेते सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांची मुलाखत अभिनेते प्रसाद ओक आणि सुशांत शेलार घेतील. तर सात ते साडेआठ या वेळे रामदास आठवले आपल्या कविता रसिकांना ऐकवतील. तर रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत रवी जाधव, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक यांच्या गप्पा रंगतील. 

बुधवारी दुपारी 2 ते साडेतीन या वेळेत प्रख्यात अभिनेते आणि नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अभिनेत्री अलका कुबल यांची उपस्थिती असेल. तर सायंकाळी सात ते आठ या वेळेत अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलाखत सुधीर गाडगीळ घेतील. 

मुलाखतींचे हे सर्व कार्यक्रम ई सकाळवर लाईव्ह पाहता येतील. सकाळच्या फेसबुक पेजवर हे कार्यक्रम त्या त्या वेळी लाईव्ह दिसतील. यांखेरीज इतरही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

 

  

Web Title: sakal news pune news balgandharv rang mandir 50th anniversary celebration