सलमान-शाहरुख एकत्र येणार?

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

सुपरस्टार सलमान खान व शाहरुख खान यांच्यातील मैत्रीचे गोडवे बॉलिवूडमध्ये गायिले जात होते; परंतु २००८ मध्ये या मैत्रीला तडा गेला. कतरिना कैफ हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्यांच्यात काही तरी बिनसल्याचे प्रथम दिसले.

सहा वर्षांचा हा दुरावा अखेर सलमानची बहीण अर्पिता हिच्या विवाहात संपल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांच्यात प्रेमाचे बंध पुन्हा निर्माण झाले आहेत. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात चित्रपटात पुन्हा एकत्र काम करण्याची इच्छा दोघांनीही व्यक्त केली. सलमान व शाहरुखने यापूरवी ‘करण-अर्जुन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम तुम्हारे है सनम’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

पडद्यावर पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्‍नावर शाहरुख म्हणाला ‘‘वो भी हो जाएगा.’’ सलमान म्हणाला, ‘‘असे होऊ शकते. जर एखादा प्रतिभावान लेखक आमच्याकडे चांगले
लेखन घेऊन आल्यास आम्ही नक्की एकत्र काम करू.’’

Web Title: salman and shahrukh khan together