ईडा पीडा टळो- वाढदिवशी सलमानची प्रार्थना

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

बॉलिवुडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानचा आज 51 वा वाढदिवस! चित्रपटांतील त्याच्या अनेक गोष्टी स्टाईल स्टेटमेंट म्हणून प्रसिद्ध होतात, आणि त्याचे चाहते त्याचं अनुकरण करताना दिसतात. तसंच, सिनेसृष्टीशिवाय वैयक्तिक आयुष्यातील वादग्रस्त घटनांमुळेही सलमान सतत चर्चेत राहिला आहे. मात्र, अनेक वर्षे कोर्ट कचेरीचा ससेमिरा मागे लागलेल्या सलमानला अशाप्रकारे चर्चेत राहणे किती महागात पडतं हे आता त्याला कळून चुकलंय. त्यामुळेच सलमानने 'स्टे ऑउट ऑफ ट्रबल' असं म्हणत थोडक्यात 'ईडा पीडा टळो' चाहत्यांना सल्ला दिलाय. 

कामात ब्रेक न घेता सतत बिझी राहणे पसंत करणाऱ्या सलमान खानने एव्हाना पन्नाशी ओलांडलीय हे त्याच्या चाहत्यांना खरं वाटत नसेल. पण त्याच्या बिझी राहण्यातच त्याच्या तरुण दिसण्याचं गमक असावं. 

वाढिदवसानिमित्त सलमाननने पनवेलच्या फार्महाऊसवर जंगी पार्टी आयोजित केली होती. आपल्या कुटुंबीयांसह जवळच्या मित्र-मैत्रिणींना त्याने आमंत्रित केलं होतं. त्यामध्ये संगीता बिजलानीपासून ते डेझी शाह यांचा समावेश होता बरं का. पुतण्या अहिलसोबत त्याने बर्थडे केक कापला. 
काय सांगता तुम्हाला पार्टीला बोलावलं नाही? वाईट मानू नका. सलमानने आपल्या चाहत्यांनाही छोटीशी ट्रीट दिली आहे. सलमानची संस्था बीईंग ह्युमनच्या उत्पादनांच्या खरेदीवर 51 टक्के सूट देण्यात येणार आहे. जॅकलीन फर्नांडिससह अनेकांनी सलमानसोबतचे छायाचित्र शेअर करीत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
Web Title: salman asks fans to stay out of trouble

फोटो गॅलरी