सलमान बाबा, तर जॅकलिन आई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस रेमो डिसूजाच्या 'रेस 3' मध्ये एकत्र दिसणार आहेत. या आधी ते 'किक'मध्ये एकत्र दिसले होते. खरंतर किकनंतर सलमान, जॅकलिन, रेमो डिसूजा दिग्दर्शितच आणखी एक चित्रपट येणार होता. या चित्रपटात सलमान खानला डान्स करायचा होता. डान्सची प्रॅक्‍टिस करता करता सलमानच्या खांद्याला दुखापत झाली आणि चित्रपटाचं सगळंच काम बारगळलं.

या चित्रपटात सलमान खान एका डान्सरची भूमिका करणार होता. ती एक लहान मुलीची कथा होती. ज्यामध्ये सलमान तिचा बाबा आणि जॅकलिन आईची भूमिका करणार होती; पण त्याआधीच 'रेस 3'वर काम सुरू झाले आणि हा चित्रपट मागेच पडला. या चित्रपटाचे नावही 'डान्सिंग डॅड' असे ठेवले गेले होते. पण, सलमाननेही आता हा चित्रपट करण्याची तयारी दर्शवली आहे. 'रेस 3'चेही काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सलमान 'किक 2' आणि 'भारत'च्या आधी हा चित्रपट पूर्ण करणार, असेही म्हटले जातेय. 'भारत'चे कास्टिंग होणे बाकी आहे आणि 'किक 2'च्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. त्यामुळे यानंतर सलमान अपूर्ण राहिलेल्या प्रोजेक्‍टवर काम करेल आणि सलमान बाबा, तर जॅकलिन आईच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. हे ऐकून दोघांचे फॅन्स नक्कीच उत्सुक झाले अाहेत. 

Web Title: salman is father and jacqueline is mother